UP Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशातील NCP चा एकमेव उमेदवार KK Sharma यांची पहा निवडणूक निकालामधील स्थिती काय

KK Sharma | PC: SamjawadiParty Twitter Account

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये 403 जागांवर निवडणूका पार पडल्या आहेत. आज या निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान भाजपाचे योगी सरकार पुन्हा सत्तेमध्ये येण्याची चिन्हं आहेत. पण या निवडणूकीत भाजपा व्यतिरिक्त दमदार कामगिरी केलेल्याउमेदवारांच्या यादीमध्ये के के शर्मा हे एक नाव आहे. के के शर्मा (K K Sharma) हे एनसीपीचे जनरल सेक्रेटरी आहेत. दरम्यान एनसीपीने युपीमध्ये उमेदवार दिलेले ते एकमेव उमेदवार आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार Bulandshahr जिल्ह्यातील Anupshahr मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले के के शर्मा दुसर्‍या स्थानी आहेत. त्यांना भाजपच्या संजय शर्मा यांचं आव्हान आहे. संजय शर्मा पहिल्या स्थानी आहे.

उत्तर प्रदेश मध्ये एनसीपीने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत युती केली होती. दरम्यान एक्झिट पोल मध्ये भाजपाकडे सत्ता राहील असा वर्तवलेला अंदाज खरा आहे. सुरूवातीला आघाडींमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सपा दुसर्‍या जागेचा सर्वात मोठा पक्ष आहे. 202 हा यूपी मधील बहुमताचा जादुई आकडा आहे. उत्तरप्रदेशमध्ये 403  जागांपैकी 399 जागांचे कल हाती स्पष्टपणे आले आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यामध्ये 248 जागांवर भाजपाची घोडदौड सुरु आहे तर  समाजवादी पक्ष 112 आणि काँग्रेसची 3 जागांवर आघाडी आहे.

यूपीचा इतिहास पाहता एकच पक्ष आतापर्यंत सत्ता स्थापन करू शकला नाही पण योगी सरकारच्या रूपाने हा विक्रम यंदा पहिल्यांदाच होण्याची शक्यता आहे.