#Confirmed: शिवसेना NDA मधून बाहेर! लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षासोबत बसणार - प्रल्हाद जोशी
यानुसार आता लोकसभा (Loksabha) व राज्यसभा (Rajyasabha) दोन्हीकडे सेनेच्या नेत्यांना विरोधी पक्षात बसवले जाणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
महाराष्ट्र सत्ता संघर्षांवरून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्या महायुतीतील वादाची ठिणगी पेटली होती. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत (Arwind Sawant) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता, यामुळे शिवसेना एनडीएतून (NDA) पूर्णपणे बाहेर पडणार असल्याचे देखील म्हंटले जात होते. याबाबत सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत शिवसेनेच्या एनडीए एग्झिट बाबत शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेनेने एनडीए बैठकीला अनुपस्थित राहून तसेच सावंत यांच्या राजीनाम्याने एनडीएतून बाहेर पडण्याची इच्छा दर्शवली होती, यानुसार आता लोकसभा (Loksabha) व राज्यसभा (Rajyasabha) दोन्हीकडे सेनेच्या नेत्यांना विरोधी पक्षात बसवले जाणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
सर्वपक्षीय बैठकीनंतर आज, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला, शिवसेनेच्या दोन्ही सदनातील खासदारांना सत्तापक्षाची जागा देण्यात आली होती. मात्र आता सत्तेत असणाऱ्या एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या राज्यसभेतील तिन्ही सदस्यांना विरोधी पक्षाची आसने देण्यात आली आहेत. तर लोकसभेत आसन व्यवस्था वाटपाची प्रक्रिया सुरू आहे, असे जोशी यांनी सांगितले.
ANI ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा यांच्या सत्तावाटप वादामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या सत्तकोंडी मध्ये शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडून राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीची कास धरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र जोपर्यंत शिवसेना केंद्रातूनही एनडीए ला राम राम करत नाही तोपर्यंत महाशिवाघडी होणे कठीण असल्याचा इशारा सेनेला दिला गेला होता. यानुसार शिवसेनेने एनडीए मधून पूर्णतः बाहेर पडण्याचा निर्णय घेत अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यातून केंद्रीय मंत्रिमंडळ पदावरही पाणी सोडले.
मागील काही दिवसात शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का या प्रश्नाने राजकीय वर्तुळात चर्चा होती, तर शिवसेना खासदार, संजय राऊत यांनी शिवसेना एनडीतून बाहेर पडण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे असे सांगितले होते आज समोर आलेल्या या अपडेट मुळे या प्रश्नाच्या उत्तरावर शिक्कामोर्तब झाला आहे.