एनडीएच्या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित, संजय राऊत यांना दूर ठेवत सुभाष देसाई लावणार हजेरी?

भाजपच्या दिल्ली कार्यालयात सायंकाळी 7 वाजता भाजप आणि एनडीएतील सर्व घटक पक्ष आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे या बैठकीचे नेतृत्व करतील. तत्पूर्वी दुपारी 4 वाजता भाजप नेत्यांची बैठक पार पडणार आहे.

एनडीएच्या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित, संजय राऊत यांना दूर ठेवत सुभाष देसाई लावणार हजेरी?
Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) प्रक्रिया पार पडली. त्यानंतर एक्झिट पोल्सनीही आपापले अंदाजव वर्तवले. या अंदाजानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) यांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, भाजप प्रणीत NDA (एनडीए) ची आपल्या घटक पक्षांची एक बैठक पार पडत आहे. या बैठकीस एनडीएतील घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीस शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मात्र अनुपस्थितीत राहणार आहेत. या बैठकीस शिवसेना प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी प्रतिनिधी म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र, संजय राऊत यांच्या ऐवजी सुभाष देसाई हेच या सभेला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीने दिले आहे. प्राप्त माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, एनडीएच्या या बैठकीस बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार हे उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त होते. मात्र, ताज्या माहितीनुसार नितीश कुमार हे या बैठकीस उपस्थितत राहणार असल्याचे समजते. (हेही वाचा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्यानंतर हे पद कोणाला मिळणार? राहुल गांधी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता )

भाजपच्या दिल्ली कार्यालयात सायंकाळी 7 वाजता भाजप आणि एनडीएतील सर्व घटक पक्ष आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे या बैठकीचे नेतृत्व करतील. तत्पूर्वी दुपारी 4 वाजता भाजप नेत्यांची बैठक पार पडणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2019 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).