सचिन पायलट यांनी काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांना केला फोन, मागितला कायदेशीर सल्ला; मग काय घडले पुढे?

जोशी यांनी नोटीस बजावली आहे. तसेच, आपल्याला निलंबीत का करण्यात येऊ नये असे विचारले आहे. या नोटीशीला 17 जुलै पर्यंत उत्तर देण्यासही सांगितले आहे.

Abhishek Manu Singhvi, Sachin Pilot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rajasthan Political Crisis: राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी (C. P.  Joshi)  बजावलेल्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ही कायदेशीर लढाई असल्याने सचिन पायलट यांना वकिलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पायलट यांनी थेट काँग्रेस प्रवक्ते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांना फोन केला. या घटनेबाबत आयएनएस या वृत्तसंस्थेने अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी संपर्क केला. या वेळी सिंघवी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पायलट यांनी मला फोन केला होता. ते माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना सांगितले की, तुम्हाला कायदेशीर सल्ला देणे हे मझ्या प्रतिमेसाठी फारसे चांगले राहणार नाही. मी असे म्हणताच आम्ही दोघेही हसलो.

सचिन पायलट आणि त्यांच्यासोबत असलेल्या 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी नोटीस बजावली आहे. तसेच, आपल्याला निलंबीत का करण्यात येऊ नये असे विचारले आहे. या नोटीशीला 17 जुलै पर्यंत उत्तर देण्यासही सांगितले आहे. या नोटिशीविरोधात पायलट यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी; हरीश साळवे, मुकुल रोहतगी यांच्यासारखे तगडे वकील मांडणार बाजू)

एका बाजूला पायलट हे न्यायालयात पोहोचले आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांची बैठक बोलावून या बैठकीस उपस्थित राहण्याचे अवाहन सचिन पायलट यांना केले होते. कायद्याचे अभ्यासक सांगतात की काँग्रेस अनुसुची 10 परिच्छेद 2 खंड (ए) लागू करु इच्छिते.

दरम्यान, सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी उद्या (17 जुलै) होणार आहे. न्यायमूर्ती हरीश शर्मा यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे ही सुनावणी केली जाईल. जेष्ठ वकील हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी सचिन पायलट यांची बाजू न्यायालयासमोर मांडतील. तर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे राजस्थान विधानसभा अध्यक्षांच्या वतीने बाजू मांडतील.