उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी काही फायदा नाही: रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्या येत्या अयोध्या भेटीला टार्गेट करत एकदा काय दहा वेंकीला जरी अयोध्येला गेलात तरी काहीही फायदा होणार नाही असा टोला लगावला आहे.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या 16 जूनला उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आपल्या खासदारांच्या समवेत अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. उद्धव यांच्या या दौऱ्याला लक्ष करून केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शनिवारी एक शाब्दिक चिमटा घेतल्याचे समजत आहे. आठवलेंच्या मते, "उद्धव ठाकरे हे एकदा काय दहा वेळा जरी अयोध्येला गेले तरी काहीही फायदा होणार नाही आणि राम मंदिर काही बनणार नाही, कारण त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा आहे". याशिवाय आता उद्धव यांना जर का आपल्या कार्यकर्त्यांना अयोध्येची सैर करवून आणायची असेल तर काही हरकत नाही पण यातून राम मंदिराचा प्रश्न काही सुटणार नाही असे देखील आठवले यांनी म्हंटले आहे.
यासोबतच वैयत्तिकरित्या आपण देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी उत्सुक असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले होते . मात्र या कोणत्याही अधिकृत निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाची भूमिका महत्वाची असेल असे ही ते म्हणत आहेत.'मंदिर पाडायला आम्हाला 17 मिनिटं लागली,मग कायदा करायला इतका वेळ का ?' - शिवसेना खासदार संजय राऊत
अयोध्येमधील राम मंदिराच्या बांधणीचा वाद हा भारताच्या इतिहासात बराच जुना मानला जातो. या मुद्दयाला धरून आजवर अनेक मोठे हल्ले, वाद, राजकीय मुद्दे समोर आले होते. तसेच शिवसेनेने देखील याआधी नोव्हेंबर मध्ये भाजपाला राम मंदिराच्या बांधणीवरुन "पहले मंदिर, फिर सरकार" अशा घोषणा देत तंबी दिली होती. त्यामुळे आता उद्धव यांची ही अयोध्या भेट राम मंदिरासाठी फायद्याची ठरतेय की आठवले यांची आकाशवाणी खरी सिद्ध होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अयोध्या वाद: मध्यस्थाद्वारे तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीस समितीची स्थापना, 8 आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश, मीडियाला वार्तांकनास बंदी: सर्वोच्च न्यायालय
एकीकडे शिवसेना भाजपा सोबतच उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांचे संबंध लोकसभा निवडणुकीच्या काळात बरेच सुधारले होते. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये युतीच्या विजयाचे बरेच श्रेय उद्धव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांना दिले होते. तसेच नव्याने स्थापित झालेल्या मंत्री मंडळात देखील आठवले यांना केंद्रीय मंत्री पद देण्यात आले होते. या नंतर देखील अचानक आठवले यांची ठाकरेंवरची ही टीका म्हणजे काहीशी अनाकलनीयच आहे.