Rajya Sabha Election 2024: भाजपा कडून Ashok Chavan, Medha Kulkarni, Dr Ajeet Gopchade यांना महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी जाहीर
यापैकी महाराष्ट्रात सहा जागा आहेत.
BJP Rajya Sabha Candidates: भाजपा (BJP) कडून आज जाहीर करण्यात आलेल्या राज्यसभा उमेदवार्यांच्या यादी मध्ये महाराष्ट्रातून तीन जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये कालच कॉंग्रेस मधून भाजपा मध्ये आलेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), डॉ. अजित गोपछडे Dr Ajeet Gopchade यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यसभेच्या निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याची उद्या 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या नाराज होत्या पण त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पहा भाजपाची उमेदवार यादी
आजच्या भाजपाच्या यादी मध्ये गुजरात मधून जेपी नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ. जशवंतसिंह परमार यांच्या नावाचा देखील समावेश आहे. दरम्यान आज कॉंग्रेस कडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सोनिया गांधींनी स्वतः राजस्थान मधून आज उमेदवारीचा अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांचं पुर्नवसन केली जाणार असल्याची चर्चा होती मात्र पंकजा मुंडे यांचं यादीत नाव नाही.
13 राज्यातील 56 राज्यसभा जागांचा कार्यकाळ2 एप्रिल दिवशी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ 3 एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश 3, बिहार 6, छत्तीसगड 1 गुजरात 4 हरयाणा 1, हिमाचल प्रदेश 1, कर्नाटक 4, मध्य प्रदेश 5, महाराष्ट्र 6, तेलंगणा 3, उत्तर प्रदेश 10, उत्तराखड 1, पश्चिम बंगाल 5, ओडिसा 2, राजस्थान 3 अशा एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.