Rajasthan Politics: राजस्थानात पुन्हा राजकीय वातावरण तापलं, अशोक गेहलोत विरुध्द सचिन पायलट कलह शिगेला
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थान कॉग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला आहे. तर दुसऱ्या बाजूला सचिन पायलट यांनी देखील अशोक गेहलोतांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे.
हल्ली राजकारणत गद्दार शब्दाची फॅशनचं झालीये की काय असं म्हणणं वावग ठरणार नाही. कारण महाराष्ट्रातही (Maharashtra) ठाकरे गट (Thackeray Group) शिंदे गटाचा (Shinde Group) गद्दार म्हणून उल्लेख करते. तर आता राजस्थानाच्या राजकारणातही (Rajasthan Politics) गद्दा शब्दाने चांगलाचं जोर पकडला आहे. कारण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी राजस्थान कॉग्रेसचे युवा नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला आहे. तर दुसऱ्या बाजूला सचिन पायलट यांनी देखील अशोक गेहलोतांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. तरी यानंतर राजस्थान कॉंग्रेसमधील (Rajasthan Congress) वाद चांगलाचं शिगेला पेटलेला दिसत आहे. काही दिवसांनंतर राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) राजस्थानात प्रवेश करणार आहे. पण भारत जोडो यात्रेची तयारी करण्या ऐवजी येथील नेते मंडळी सध्या ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी एनडीटीव्ही (NDTV) या वृत्तवाहिनीशी बोलताना सचिन पायलट (Sachin Pilot) यांना गद्दार म्हणाले. एक गद्दार राजस्थानचा मुख्यमंत्री कसा होवू शकतो. कॉंग्रेस हायकमांड कधीही एका गद्दारास मुख्यमंत्री करणार नाही. सचिन पायलट यांनी कॉंग्रेस पक्षाची फसवणूक केली आहे. राजस्थान कॉंग्रेसचे आमदार कधीही पायलट यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारणार नाही या शब्दात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (हे ही वाचा:- Gujarat Election: गुजरात निवडणुकीत क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या घरात रणसंग्राम, रविंद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजा कडून बायको रिवाबा जडेजा विरुध्द तक्रार दाखल)
तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या आरोपांना सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गेहलोत यांचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे असुन कुणाच्या सांगण्यावरुन गेहलोत असे आरोप करतात असा सवाल सचिन पायलट यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकारची बालिश वक्तव्ये या पुढे करु नये त्या ऐवजी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजस्थानात कसं विजयी करता येईल यावर गेहलोतांनी लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांना दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)