Rahul Kalate: राहूल कलाटे करणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश, निलम गोऱ्हेनंतर राहूल कलाटे यांची सोडचिठ्ठी
नीलम गोऱ्हे यांच्या नंतर राहूल कलाटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षात प्रवेश केला आहे.
Rahul Kalate: चिंचवडचे राहूल कलाटे (Rahul Kalate) एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात (Eknath Shinde Shivsena) प्रवेश करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) आणखी मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह राहुल कलाटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राहुल कलाटे हे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे राहील कलाटे यांनी वक्यव्य केलं.
काही दिवसांपुर्वीचं विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. . त्यापूर्वी मनीषा कायंदे, अमेय घोले, राहुल कनाल यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाला राजकिय धक्का लागला आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल कलाटे यांनी राजकिय पक्षांतर केलं.
उध्दव ठाकरे यांच्या गटात राहुल कलाटे काम करायचे. हे 2014 पासून शिवसेना पक्षात सक्रीयपणे काम करत होते. परंतु 2019 आणि 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठा मताधिक्याने पराभव झाला होता. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी होती. परंतु राष्ट्रवादीने कलाटे यांना डावलून नाना काटे यांना उमेदवारी दिली होती.2017 पहिल्यांदा शिवसेनकडून नगरसेवक झाले. त्यानंतर आता चिंचवडमधील चार माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राहुल कलाटे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे.