IPL Auction 2025 Live

'चौकीदार चौर हैं' विधान राहुल गांधी यांना भोवले, सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस

राफेल करारावरुन (Rafale Deal) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चौकीदार चौर हैं असे वक्तव्य अनेकदा केले होते.

(संपादित आणि संग्रहीत प्रतिमा)

राफेल करारावरुन (Rafale Deal) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चौकीदार चौर हैं असे वक्तव्य अनेकदा केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांनी केलेले वक्तव्य भोवले असून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांना नोटीस पाठवली आहे. याबद्दल भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायलयाने राहुल गांधी यांना 22 एप्रिल पर्यंत वेळ देऊ केला आहे. राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी बहुतेक वेळा चौकीदार चौर हैं असे वक्तव्य त्यांच्या भाषणातून केले होते. मात्र राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायलयाशी संबंध लावला असल्याने म्हटले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध प्रियांका गांधी निवडणुक लढवणार, पक्षात चर्चा सुरु: सूत्र)

तर या करारात मोदी यांच्या नावाचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच करारची कागदपत्रे स्विकारण्यासंबंधित निर्णय घ्यायचा होता. परंतु सुप्रीम कोर्टानेसुद्धा चौकीदार चौर हैं हे मान्य केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.