Congress Protest On BJP: भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची नाना पटोलेकडून घोषणा, भाजपने निर्लज्जपणाची परिसीमा ओलांडली
दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन आज संपले, पण जोपर्यंत पंतप्रधान माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मुंबई: पंतप्रधान मोदी यांनी (PM Narendra Modi) लोकसभेत (Loksabha) केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाला सुरुवात झाली. परंतु, काही वेळातच मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात (Congress Protest On BJP) पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच नाना पटोले म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राबद्दल जे काही बोलले आहे ते चुकीचे आहे. मुंबई सोडण्यासाठी परप्रांतीयांना मोफत रेल्वे तिकीट देण्याचा काँग्रेसवर केलेला आरोप चुकीचा आहे. दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन आज संपले, पण जोपर्यंत पंतप्रधान माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
भाजपने निर्लज्जपणाची परिसीमा ओलांडली
भाजपला हे आंदोलन हिंसक बनवायचे आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही. काँग्रेस गांधीजींच्या अहिंसा विचारसरणीसोबत काम करेल. भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याला चावा घेतला. त्यांनी निर्लज्जपणाची परिसीमा ओलांडली आहे. असेही नाना पटोले म्हणाले. (हे ही वाचा Maharashtra: शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणत्याही अटी पाळणार नाही, भाजप नेते राम कदम यांचा ठाकरे सरकावर हल्लाबोल)
Tweet
आंदोलदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक
आंदोलनकर्त्या नाना पटोले यांना पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरच थांबवलं. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड बाहेर जाण्याचा साधा प्रयत्नही आंदोलकांनी केला नाही. आणि काही वेळातच नानांनी आंदोलन थांबवत असल्याची घोषणा केली, मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. नाना पटोले यांच्या निवासस्थानी मरिन ड्राईव्ह पोलिसांचा ताफा तैनात होता. नाना पटोले यांना ताब्यात घेण्यासाठी गाडीही तैनात होती. पण पोलिसांना फार प्रयत्न करावे लागले नाहीत.