Modi Cabinet Swearing in Ceremony Live Streaming: नरेंद्र मोदी पंतप्रधान पद शपथविधी सोहळा इथे पाहा लाईव्ह
सध्या स्थितीला मंत्रिपदाच्या चर्चेत शिवसेनेचे अरविंद सावंत, भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, रावसाहेब दाणवे, संजय धोत्रे या मंडळींचे नाव घेतले जात आहे. तर, आगोदरच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुभाष भामरे, रामदास आठवले यांचे काय होणार याबातही मोठी उत्सुकता आहे. ही सर्व उत्सुकता शपतविधी कार्यक्रमादरम्यान संपत जाणा आहे. त्यासाठी पाहात राहा लाईव्ह स्ट्रिमिंग.
PM Modi Swearing-in Ceremony 2019: राजधानी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन आज शिस्तबद्ध पद्धतीने गजबजून गेले आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशभरातील जनतेचे जनमत स्वीकारुन देशात भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेवर येत आहे. हे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करेन. त्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पंतप्रधन पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर एनडीए सरकार मूर्त रुपात सत्तेवर येईल. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्यासाठी निवडक खासदार पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा आज (गुरुवार, 30 मे 2019) सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवन परिसरात सुरु होईल. हा संपूर्ण सोहळा आपण लाईव्ह पाहू शकता. त्यासाठी खालील वृत्तात दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सुमारे 40 ते 45 चेहरे असू शकतील अशी चर्चा आहे. दरम्यान, मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांची एकूण संख्या अद्याप बाहेर आली नाही. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतरच ती समजू शकणार आहे. त्यातही या वेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना शपथ दिली जाईल की काही खासदारांचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश केला जाईल याबबतही उत्सुकता आहे.
पंतप्रधान पद शपथविधी सोहळा लाईव्ह स्ट्रिमिंग
दरम्यन, महाराष्ट्राच्या वाट्याला या वेळी किती मंत्रिपदं येणार याबाबतही बरीच उत्सुकता आहे. सध्या स्थितीला मंत्रिपदाच्या चर्चेत शिवसेनेचे अरविंद सावंत, भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, रावसाहेब दाणवे, संजय धोत्रे या मंडळींचे नाव घेतले जात आहे. तर, आगोदरच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुभाष भामरे, रामदास आठवले यांचे काय होणार याबातही मोठी उत्सुकता आहे. ही सर्व उत्सुकता शपतविधी कार्यक्रमादरम्यान संपत जाणा आहे. त्यासाठी पाहात राहा लाईव्ह स्ट्रिमिंग.