MLAs Disqualification Case In Maharashtra: सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर एकत्र होणार सुनावणी

13 ऑक्टोबरला शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी प्रकरणी एकत्र सुनावणी होईल.

Supreme Court | (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये मागील दीड वर्षात शिवसेना (Shiv Sena) आणि एनसीपी (NCP) या पक्षात फूट पडली आहे. यामध्ये पक्षात दोन गट उभारून एनसीपी, शिवसेना आणि भाजपा या तीन पक्षांनी मिळून सरकार बनवलं आहे. दरम्यान यामध्ये एनसीपीचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांनी मूळ पक्षाला सोडून सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगासोबतच हा लढा सर्वोच्च न्यायालयातही सुरू आहे. यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील या अपात्र आमदारांवरील कारवाईची सुनावणी आता एकत्र घेतली जाईल अशी घोषणा केली आहे.

एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांविरोधात कारवाई करा यासाठी पत्र दिल्याचं म्हटलं आहे. पण अध्यक्ष वेळखाऊपणा करत असल्याचं म्हणत त्यांच्या विरूद्ध कारवाईचे निर्देश द्या अशी मागणी कोर्टात केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेसंबधीच्या सुनावणीची पुढील तारीख 13 ऑक्टोबर ठरली आहे.

13 ऑक्टोबरला शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी प्रकरणी एकत्र सुनावणी होईल. राहुल नार्वेकरांविरोधात एनसीपी कडून जयंत पवारांनी याचिका केली आहे तशी याचिका ठाकरे गटाकडून सुनील प्रभूंनी केली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतता  प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार होती. परंतु आज अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या 41 आमदारांवर कारवाई करण्याच्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सूचना देण्याची मागणी करणाऱ्या शरद पवारांच्या याचिकेवर 13 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान आज कोर्टात पवार गटाकडून याचिका केल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी झाली आहे. तर पक्षचिन्ह आणि नाव याबाबत निवडणूक आयोगामध्ये दुसर्‍यांदा सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीला शरद पवार स्वतः दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हजर राहिले होते.