मायावती तृतीयपंथी, भाजप महिला आमदाराचे वादग्रस्त विधान
मुगलसराय येथील भाजप आमदार साधना सिंह (Sadhna Singh) यांना बसपा नेत्या मायावती (Mayawati) तृतीयपंथी असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) समाजवादी (Samajwadi Party) आणि बहुजन समाजवादी (Bahujan Samajwadi Party)पक्षाने केलेल्या आघाडीमुळे भाजप (BJP) पक्षाची झोप उडाली आहे. त्यामुळे भाजपकडून विरोधकांवर विविध प्रकारे टीका करण्यात येत आहे. त्यामुळेच मुगलसराय येथील भाजप आमदार साधना सिंह (Sadhna Singh) यांना बसपा नेत्या मायावती (Mayawati) तृतीयपंथी असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून महिला आमदारांना नोटीस धाडण्यात आली आहे.
लखनौ येथील गेस्ट हाऊसमध्ये मायावतींना झालेल्या वस्रहरणाचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे मयावतींनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. साधन सिंह यांनी मायावती ह्या ना महिला ना पुरुष आहेत असे वादग्रस्त विधान करत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. (हेही वाचा-पंतप्रधान मोदी यांनी आपले सरकार ‘अमर’ आहे या भ्रमातही राहू नये: शिवसेना)
या पद्धतीची महिला सत्तेत असणे म्हणजे राजकरणाला कलंक असल्याचे ही साधना यांनी म्हटले आहे. तर मायावतींना महिला म्हणून संबोधण्यास लाज वाटते असे ही साधना यांनी चंदौली येथील जाहीर सभेत म्हटले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय पक्षातील नेत्यांनी साधना सिंह यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.