Mamata Banerjee Political Career: ममता बॅनर्जी यांचा संघर्ष, राजकारण आणि सत्ता
ममता बॅनर्जी यांच्या आजवरच्या एकूण राजकीय जीवनातील या निवडणुकीतील विजय हा सर्वोच्च मानला जातो आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) मध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress) पक्षाच्या रुपात एकहाती सत्ता मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यामुळे भाजपला प्राप्त झालेल्या मोठ्या शक्तीचा त्यांनी निर्णायक पराभव केला. पश्चमि बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान निर्माण केल्याचा आभास निर्माण केला जात होता. परंतू, हा आभास केवळ प्रसारमाध्यमांतूनच निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. ममता बॅनर्जी यांच्या विजयामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झालेला पराभव हा केवळ भाजपचा नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा झालेला पराभव असल्याचे मानले जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या आजवरच्या एकूण राजकीय जीवनातील या निवडणुकीतील विजय हा सर्वोच्च मानला जातो आहे. बंगालची वाघीण म्हणून ओळकल्या जाऊ लागलेल्या ममता बॅनर्जी यांच्या राजकारण, संघर्ष आणि सत्ताप्राप्तीचा हा अल्पसा आढावा.
दिदी लोकप्रिय
ममता बॅनर्जी या सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्यांना त्यांचे समर्थक, अनुयायी दिदी म्हणून संबोधतात. राज्य आणि देशाच्या राजकारणातही त्या दिदी म्हणूनच लोकप्रिय आहेत. पश्चिम बंगाल येथील कोलकातामध्ये 5 जानेवारी 1955 मध्ये जन्मलेल्या ममता बॅनर्जी या केंद्रात दोन वेळा रेल्वे मंत्री आणि पश्चिम बंगालमध्ये दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. विधानसभा निवडणूक 2021 मध्ये तृणमूल काँग्रेस हा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यामुळे ममता बॅनर्जी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. म्हणजेच मुख्यमंत्री पदाचीही त्यांनी हॅटट्रीक केली आहे. त्यांच्या रुपात भारताला पहिल्या रेल्वे मंत्री मिळाल्या. (हेही वाचा, Assembly Election Results 2021: एम करुणानिधी यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये प्रथमच DMK ची सत्ता; जाणून घ्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार MK Stalin यांच्याबाबत खास गोष्टी)
दूध विक्रेता ते राजकीय नेता
आपण केलेल्या व्यक्तीगत कामांची ममता बॅनर्जी यांनी जाहीरात केल्याचे पाहायला मिळत नाही. परंतू, राजकारणात येण्यापूर्वी कॉलेज जीवनात त्यांनी दूध विक्रेता म्हणूनही काम केले आहे असे सांगितले जाते. ममता यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते. ममता यांच्या बालपणी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे संघर्ष हा त्यांच्या जीवनात लहापणापासूनच आला आहे. त्यांनी लहानपणापासून आपल्या भावांचे आणि बहिणींची जाबदारी पार पाडली.
शिक्षण आणि पदवी
ममता बॅनर्जी यांनी दक्षिण कोलकाता येथील जोगमाया देवी महाविद्यालयातून इतिहास विषयात ऑनर्स ही पदवी प्राप्त केली आहे. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी इस्लामिकी इतिहास विषयात मास्टरीची पदवी घेतली आहे. श्रीशिक्षायतन कॉलेजमधून त्यांनी बीएडची पदवी मिळवली आहे. तसेच, कोलकाता येथील जोगेश चंद्र चौधरी कॉलेजमधून त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे.
राजकीय करीअरला सुरुवात
ममता बॅनर्जी यांच्या राजकीय करिअरला 1970 मध्ये सुरुवात झाली. तेव्हा त्या प्रथम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या झाल्या. त्यांनी 1976 ते 1980 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या महासचीव म्हणून काम पाहिले. पुढे 1984 मध्ये ममतांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) चे ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांना पराभूत केले. जादवपूर लोकसभा मतदारसंघातील त्यांचा हा विजय जायंट किलर ठरला. त्यामुळे त्यांना तरुण खासदार होण्याचा बहुमानही मिळाला.
दरम्यान, बॅनर्जी यांना भारतीय युवा काँग्रेसचे महासचिव बनविण्यात आले. परंतू, 1989 मध्ये त्या काँग्रेस विरोधी लाटेत जिथून निवडून आल्या होत्या त्याच जादवपूर लोकसभा मतदार संघात पराभूत झाल्या. मालिनी भट्टाचार्य यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 1991 मध्ये त्या दक्षिण कोलकाता लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. दक्षिणी कोलकाता लोकसभा मतदार संघातून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या विप्लव दासगुप्ता यांना पराभूत केले. पुढे 1996, 1998, 1999, 2004 आणि 2009 अशा सलक पणे त्या लोकसभेव निवडूण येत गेल्या. सन 1991 मध्ये केंद्रात प व्ही नरसिंहराव यांचे सरकार सत्तेतहोते नरसिंहराव यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यांच्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाची आणि इतरही काही जबाबदाऱ्या सोपवल्या.
साधी राहणी
ममता बॅनर्जी यांची राहणी अत्यंत साधी असते. परंपरागत असलेली बंगाली सूती साडी. पायात साधी चप्पल असा त्यांचा पेहराव असतो. त्यांना उंची साड्या, मेकअप, दागदागने आशांचा फारसा मोह नाही. सार्वजनिक जिवनामध्ये त्यांनी कधीही अशा गोष्टी वापरल्याचे पाहायला मिळाले नाही. खांद्यावर एक सुती थैली त्यांच्या सोबत असते. ही त्यांची ओळख बनली आहे. त्या अविवाहीत आहेत.
काँग्रेससोबत मतभेद तृणमूल पक्षाची स्थापना
साधारण 1996-97 मध्ये ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेतृत्वाचे मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पश्चिमबंगालमध्ये काँग्रेस पक्ष सीपीएमचे बाहुले असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे 1 जानेवारी 1998 मध्ये त्यांनी भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या स्वत: पक्षाच्या अध्यक्षा बनल्या. 1998 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी 8 जागांवर विजय मिळवला.
'मां, माटी, मानुष'
पश्चिम बंगालमध्ये सन 2011 मध्ये 'मां, माटी, मानुष' चा नारा देत त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. 34 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना आव्हान देत तृणमूल काँग्रेसची सत्ता आणली. त्या वेळी ममतांच्या पक्षाने 294 पैकी 184 जागांवर सत्ता मिळवली. तेव्हापासून ममता बॅनर्जी यांनी सलगपणे सत्ता राखली आहे.