दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज भाजपची बैठक, उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता

त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी रणनिती काय असावी याकडे आता जास्त लक्ष दिले जात आहे.

Narendra Modi and Amit Shah (Photo Credits-PTI)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी रणनिती काय असावी याकडे आता जास्त लक्ष दिले जात आहे. याच पार्श्वभुमीवर आज (29 सप्टेंबर) दिल्लीत (Delhi) भाजप (BJP) पक्षाची बैठक पार पडणार असून महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थितीत राहणार आहेत.

भाजपच्या बैठकीला अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी नुकतीच दिल्लीत विधानसभा निवडणूकीसाठी भाजप पक्षाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली. परंतु त्यावेळी नरेंद्र मोदी विदेशी दौऱ्यावर असल्याने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. पण आज नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील उमेदवार कोण असणार यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत शिवसेना सोबतच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ही आज अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आजच्या बैठकीला नितीन गडकरी, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील. सुधीर मुनगंटीवार उपस्थितीत लावणार आहेत.(शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरे यांच्या विधानाने चर्चांना उधाण)

महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत यापैकी 44 जागा या युतीशी संलग्न मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 220 जागांवर विजय मिळवता येईल असा दावा केला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप युती बाबात बोलताना त्यांनी असे म्हटले की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विभाजनापेक्षा युतीत जागा वाटपाचा निर्णय अधिक कठीण आहे. जर शिवसेना सत्तेत सामिल होण्याऐवजी विरोधात असते तर, आज परिस्थिती वेगळी असते. परंतु भाजप-शिवसेना यांच्यात काहीही निर्णय होईल, तो आपल्याला कळवला जाईल" असे म्हटले आहे.महा