मध्य प्रदेश: खासदार नकुलनाथ यांनी स्वखर्चातून शिवाजी महाराजांचे 2 पुतळे उभारणार, भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी कठोर शब्दात दिली 'ही' प्रतिक्रिया
तसेच या पुतळ्याचे उद्घाटन सुद्धा मोठ्या थाटामाटात करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करणार असल्याचे जाहिर केले आहे. तसेच या पुतळ्याचे उद्घाटन सुद्धा मोठ्या थाटामाटात करण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ (Nakul Kamal Nath) याने शिवाजी महारांचे दोन नवे पुतळे उभारणार असून त्याची उभारणी स्वखर्चाने करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यावरुन जो गदारोळ आणि वाद निर्माण झाला होता तो मिटला आहे.
गुरुवारी संध्याकाळी कमलनाथ यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यावरुन जो वाद निर्माण झाला होता तो संपवण्यासाठी समोर आले होते. त्यांनी असे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. त्यामुळे अशा गौरवशाली आणि शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा उत्सव धुमधामात झाला पाहिजे.(हार्दिक पटेल गेले 20 दिवसांपासून बेपत्ता, पत्नी किंजल यांचा गुजरात सरकार प्रशासनावर आरोप)
यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्रात जसे राजकिय पक्ष सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेच चित्र आता मध्य प्रदेशात होईल की काय याची शंका आहे. तसेच महाराजांचा पुतळ पाडून त्यांचा अपमान केला आणि त्यानंतर आता पैशांचा माज दाखवत आहेत. सौंसर येथील जनतेकडे पुतळा पुन्हा भागीदारीने उभारण्याचे सामर्थ्य असल्याची ही टीका कमलनाथ सरकारवर केली आहे.
दरम्यान, छिंदवाडा येथील सौंसर ब्लॉक मध्ये 12 फेब्रुवारीला मोहगाव चौकाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे स्थापन करण्यात आले. या स्थापनेसाठी शिवसेनेसह अन्य पक्षाच्या नेत्यांसह स्थानिकांनी उपस्थिती लावली होती. परंतु पुतळा स्थापन केल्यानंतर रातोरात नगरपालिकेने जेसीबी मशीन चालवत महाराजांचा पुतळा हटवला होता. यामुळे राजकिय वातावरण सुद्धा तापले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यानंतर छिंदवाडा-नागपूर महामार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले. भोपाळ, छिंदवाडा आणि मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात सुद्धा या प्रकरणामुळे संताप व्यक्त करण्यात आला. एवढेच नाही तर कमलनाथ सरकावर सुद्धा जोरदार टीका करण्यात आली होती.