IPL Auction 2025 Live

Lok Sabha Elections 2024 Winning Candidates: भारतीय सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात; पहा 18व्या लोकसभेतील विजयी खासदारांची संपूर्ण यादी!

सध्या महाराष्ट्रात भाजपा 13, शिवसेना उबाठा गट 11, कॉंग्रेस 11, शरदचंद्र पवार यांचा एनसीपी 6, अजित पवारांचा एनसीपी 1 आणि अन्य एका जागेवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election Results 2024

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल ( Lok Sabha Elections 2024 Result) जाहीर होत आहे. सध्या देशभर 18 व्या लोकसभेसाठी मतमोजणी सुरू आहे. एक्झिट पोल चा अंदाज फोल ठरवत अनेक ठिकाणी एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडी (India Alliance) यांच्यामध्ये कांटे की टक्कर झाली आहे. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा जागांवर निवडणूका झाल्या आहेत. आता त्याचे निकाल हळू हळू समोर येत आहेत. सध्या महाराष्ट्रात भाजपा 13, शिवसेना उबाठा गट 11, कॉंग्रेस 11, शरदचंद्र पवार यांचा एनसीपी 6, अजित पवारांचा एनसीपी 1 आणि अन्य एका जागेवर आघाडीवर आहे.

महाराष्ट्रात इंडिया आघाडीचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. उबाठा, शरद पवार गट आणि कॉंग्रेसची कामगिरी चमकदार झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रातही शिवसेना, एनसीपी फूटीचा फायदा कॉंग्रेसला झाल्याचं पहायला मिळलं आहे.

महाराष्ट्रातील 48 जागांवरील विजयी उमेदवार

मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई ( शिवसेना उबाठा गट)

उत्तर मध्य मुंबई - पियुष गोयल (भाजपा)

सातारा - उदयन राजे भोसले (भाजपा)

कोल्हापूर - शाहू महाराज (कॉंग्रेस)

सांगली - विशाल पाटील  (अपक्ष)

शिरूर - डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार एनसीपी)

बारामती - सुप्रिया सुळे  (शरद पवार एनसीपी)

रत्नागिरी सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजपा)

जळगाव - स्मिता वाघ

मुंबई  उत्तर पश्चिम - अमोल कीर्तीकर  (उबाठा शिवसेना)

कल्याण - श्रीकांत शिंदे

ठाणे - नरेश म्हस्के

लातूर - डॉ. शिवाजीराव काळगे

रावेर - रक्षा खडसे

वर्धा - अमर काळे

ईशान्य मुंबई -  संजय दिना पाटील

नागपूर - नितीन गडकरी

अमरावती - बळवंत वानखेडे

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर

Election Partywise Iframe

दरम्यान 543 जागांवर लोकसभेसाठी खासदार जनतेमधून निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये आता 272 हा बहुमताचा आकडा आहे. या जादुई आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी सध्या एनडीए आणि इंडिया आघाडी कडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यामुळे आता सत्तेत कोण बसणार ? याकडे लोकांचे लक्ष आहे.