Lok Sabha Elections 2019: भाजप पक्षाकडून 21वी उमेदवार यादी जाहीर, गोरखपुर येथून रवि किशन ह्याला तिकिट जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) पक्षाकडून सोमवारी (15 एप्रिल) आपली 21वी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) पक्षाकडून सोमवारी (15 एप्रिल) आपली 21वी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भोजपुरी अभिनेता रवि किशन (Ravi Kishan) ह्याला गोरखपुर (Gorakhpur) येथून तिकिट देण्यात आले आहे. यापूर्वी रवि किशन जौनपुर येथून निवडणुक लढवणार असल्याची चर्चा होती. तसेच प्रतापगढ येथून संगम लाल गुप्ता, देवरिया मधून रमापति राम त्रिपाठी, आंबेडकर नगर येथून मुकुट बिहारी, संत कबीर नगर मधून प्रवीण निषाद, जौनपुर मधून केपी सिंह आणि भोदाई येथून रमेश बिंद यांना तिकिट देण्यात आले आहे.
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत रवि किशन ह्यांची उमेदवारी नाव महत्वाचे आहे. तर 2014 मध्ये रवि किशन ह्याला काँग्रेस पक्षाकडून तिकिट देण्यात आले होते आणि जौनपुर येथून निवडणुक लढवली होती. त्यावेळी रवि किशन ह्याला पराभव स्विकाराव लागला होता. त्यानंतर 2017 मध्ये रवि किशन ह्याने भाजपमध्ये प्रवेश केला.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: BJP पक्षाने जाहीर केली 6 उमेदवारांची यादी, केंद्रीय मंत्री यांचा मुलगा IAS अधिकारी बृजेंद्र सिंह ह्याला दिले तिकिट)
गोरखपुर येथील जागा फार महत्वपूर्ण आहे. येथे भाजप पक्षाचा झेंडा 1989 पासून झळकत असून गेल्या काही वर्षातील पोटनिवडणुकीत प्रवीण कुमार निषाद ह्याने या जागेवर समाजवादी पक्षाकडून झेंडा फडकवला होता. उत्तर प्रदेशात योगी आदित्यानाथन या जागेवर पाच वेळा खासदार राहिले आहेत. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला.