भाजप पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासणार, राम माधव यांचा दावा

सरकार स्थापन करण्यासाठी भाजप (BJP) पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासेल असा दावा भाजप सरचिटणीस राम माधव (Ram Madhav) यांनी केला आहे.

Ram Madhav (Photo Credits-Twitter)

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहेत. तर येत्या 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी सरकार स्थापन करण्यासाठी भाजप (BJP) पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासेल असा दावा भाजप सरचिटणीस राम माधव (Ram Madhav) यांनी केला आहे.

तर भाजप अध्यक्ष अमित शहा, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूकीच्या सर्व प्रचारसभांमध्ये केंद्रात भाजपची सत्ता स्वबळावर येईल असे म्हटले आहे. तर राम माधव यांनी पाचव्या टप्प्यातील निवडणूकीसाठी मतदान होण्यापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत हे वक्तव्य केले होते. त्याचसोबत जर भाजप पक्ष स्वबळावर 271 जागा जिंकला तर खुश होऊ नाहीतर एनडीएच्या घटक दलांसोबत आम्ही सरकार बनवू शकतो असे सुद्धा राम माधव यांनी म्हटले आहे.(अमेठी: काँग्रेस पक्षाला मत देण्यासाठी महिलेवर दबाव, व्हिडिओ व्हायरल Video)

2014 मध्ये भाजप पक्षाला उत्तर भारतात जागांवर विजय मिळवणे कठीण झाले होचे. तर हिंदी भाषा असलेली राज्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली एनसीआर यांसारख्या ठिकाणी 191 जागांवर विजय मिळवता आला होता.