'आधी देश, मग पक्ष आणि मी', गांधीनगर येथून पत्ता कट झाल्यानंतर प्रथमच लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया

K. Advani) यांना गांधीनगर (Gandhinagar) येथून उमेदवारी देण्यात आली नाही.

L.K. Advani (Photo Credits-Twitter)

भारतीय जनता पार्टीचे (BJP) जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (L. K. Advani) यांना गांधीनगर (Gandhinagar) येथून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यानंतर अडवाणी यांनी गुरुवारी प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून भाजप कडून पत्ता कट केल्याचे दुख व्यक्त केले आहे. त्यामध्ये अडवाणी यांनी असे म्हटले आहे की, 'आधी देश, मग पक्ष आणि मी'.

लालकृष्ण अडवाणी यांनी भारताच्या माजी उप-पंतप्रधानाचा कार्यभार सांभाळला होता. तर भाजप पक्षाला भारताच्या राजकरणात प्रमुख पक्ष बनवण्यासाठी अडवाणी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु पक्षातील सध्याच्या नेत्यांसोबत त्यांचे पटत नसल्याचे उघडपणे सांगितले जात नाही आहे.

जवळजवळ पाच वर्षानंतर अडवाणी यांनी त्यांची गोष्ट उघडपणे मांडण्यासाठी ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट नाव ब्लॉगच्या शीर्षकाला दिले आहे. त्याचसोबत ब्लॉगमधून अडवाणी यांनी सध्याच्या भाजप पक्षाच्या कार्यप्रणालीवर निशाणा साधला आहे. तसेच ब्लॉगच्या शीर्षकाप्रमाणे नियमाचे पालन आता आणि यापुढे सुद्धा करणार असल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-अमित शाह यांना व्हेटर्नरी डॉक्टर C.J. Chavda देणार टक्कर; गांधीनगर लोकसभा मतदारसंघ, 7 मुद्दे)

ANI ट्वीट:

त्याचसोबत अडवाणी यांनी गांधीनगर जनतेचे धन्यवाद मानले आहेत. तसेच गांधीनगर मधील जनतेने मला 1991 नंतर सहा वेळा लोकसभेसाठी निवडणून दिले. तुमचे प्रेम आणि आदर नेहमीच करणार असल्याचे ही अडवाणी यांनी म्हटले आहे.