Kailash Gahlot Quits AAP: 'आप'ला मोठा धक्का! मंत्री कैलाश गेहलोत यांचा पक्षाला रामराम; दिल्ली सरकारवर गंभीर आरोप

दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे पाठवला आहे.

Photo Credit- X

Kailash Gahlot Quits AAP: दिल्लीचे मंत्री कैलाश गेहलोत (Kailash Gahlot) यांनी केजरीवाल यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा आणि आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) सोडचिठ्ठी दिली आहे. राजीनामा पत्रात त्यांनी यमुना स्वच्छता आणि शीशमहलच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेहलोत यांनी पत्रात लिहिले की, आम्ही गेल्या निवडणुकीत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु स्वच्छता झाली नाही. आम्ही आमचे आश्वासन पूर्ण करू शकलो नाही. (Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर दोन जिल्ह्यात संचारबंदी, 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी, जमावाकडून गोळीबार)

परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तसेच 'आप'च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्या प्रामाणिक राजकारणामुळे आम्ही आप पक्षात आलो ते आता होत नसल्याचा आरोप गेहलोत यांनी पत्रात केला आहे. पक्षाचे निमंत्रक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानाला 'शीशमहल' म्हणत त्यांनी अनेक आरोपही केले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मंत्री आणि आप नेते कैलाश गेहलोत यांनी आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे लिहिले आहे की, 'शीश महालासारखे अनेक लाजिरवाणे आणि विचित्र वाद आहेत. जे आता सर्वांच्याच मनात शंका निर्माण करत आहेत. सामान्य माणूस म्हणून विश्वास आहे की नाही? यागोष्टींवरून स्पष्ट झाले आहे की दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्राशी लढण्यात व्यतीत करत आहे. काम होत नाही. त्यामुळे माझ्याकडे 'आप'पासून फारकत घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

कैलाश गेहलोत कोण आहेत?

कैलाश गेहलोत यांचा जन्म 11 मार्च 1974 रोजी नवी दिल्ली येथे गेहलोत गोत्रातील जाट कुटुंबात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ लॉ, मास्टर ऑफ लॉ या पदव्या घेतल्या आहेत. दिल्लीच्या मागील सरकारमध्ये परिवहन आणि पर्यावरण खात्याचा कार्यभार सांभाळणारे कैलाश गेहलोत यांनी यावेळीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी कैलाश यांनी नजफगड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अजित सिंह खारखारी यांचा पराभव करून विजय मिळवला होता.

कैलाश गेहलोत यांच्याविरोधात ईडी आणि आयकर प्रकरणे प्रलंबित आहेत. कैलाश गेहलोत यांच्यावर ईडी आणि इन्कम टॅक्सने अनेक छापे टाकले होते.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif