न्यायाधीश मुरलीधर यांची पंजाब-हरियाणा हायकोर्टात बदली केल्याने राहुल-प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला घेरले

मुरलीधर यांची बदली केल्याने आता राजकरणात नवा वाद सुरु झाला आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी न्यायाशीध एस. मुरलीधर यांची बदली केल्याने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी/ प्रियंका गांधी वाड्रा ( फोटो क्रेडिट- PTI )

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली केल्याने आता राजकरणात नवा वाद सुरु झाला आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी न्यायाशीध एस. मुरलीधर यांची बदली केल्याने केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, न्यायाधीश मुरलीधर यांची सध्याची परिस्थिती पाहता मध्यरात्रीच बदली केल्याची बाब ही धक्कादायक नाही तर लाजिरवाणी आहे. सरकारला न्यायाचे तोंड बंद करु पाहत आहे. लाखो लोकांना न्यायावर विश्वास आहे. मात्र त्यांचा विश्वासघात करणे अयोग्य आहे. न्यायाशीध मुरलीधर यांची दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा कोर्टात बदली केली आहे.

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, शूर न्यायाधीश लोया यांची बदली करण्यात आली नव्हती. तर काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाल यांनी सुद्धा भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी असे म्हटले की, हायकोर्टाचे न्यायाधीश मुरलीधर आणि न्यायाशीध तलवंत सिंह यांनी आंदोलन भडकवण्यात भाजपच्या नेत्यांची भुमिका पाहून त्यांच्या विरोधात FIR दाखल करणे आणि दिल्ली पोलिसांना संविधान आणि कायद्यानुरुप कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते तरीही त्यांच्यासोबत असे करण्यात आले आहे.(दिल्ली हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारत अमित शहा यांंनी केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा: सोनिया गांधींचा हल्लाबोल)

दरम्यान, सुनावणी दरम्यान न्यायाधीश मुरलीधर यांनी पोलिसांना फटकारले होते. सुनावणीदरम्यान भडकवणारी भाषणांबाबत भाजपच्या तीन नेत्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात प्राथमिक तक्रार दाखल न केल्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप नेत्यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यावेळी हायकोर्टाने संताप व्यक्त करत दिल्लीत दुसऱ्यांदा 1984 मध्ये होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif