हेमंत सोरेना यांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांची अनुपस्थिती
या शपथविधीसाठी अनेक दिग्गन नेतेमंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे.
झारखंडचे जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी यांच्या युतीला बहुमत मिळाल्यानंतर आज हेमंत सोरेना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीसाठी अनेक दिग्गन नेतेमंडळींना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ही शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या दोघांनी हेमंत सोरेना यांच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यावेळी विरोधी पक्षाकडून जोरदार प्रदर्शन करण्यात येणार आहे. याच प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनी न जाण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार ही या शपथविधिला अनुपस्थिती लावणार आहेत. कारण शरद पवार आज पनवेल येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. रिपोर्टच्या मते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा आपली उपस्थितीत दर्शवणार नाही आहेत.(महाराष्ट्र, झारखंडमध्ये सरकार गमावल्यानंतर दिल्ली निवडणुकीपूर्वीच भाजप तयारीत)