जम्मू-कश्मीर: नजरकैदेतून मुक्त केल्यानंतर फारूक अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
याच दरम्यान नॅशनल कॉन्फ्रेंस नेते फारूक अब्दुल्ला यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र शासित जम्मू-कश्मीर सरकारने शुक्रवारी एका मोठा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री फारूक (Farooq Abdullah) अब्दुल्ला यांना नजरकैदेतून मुक्त केले आहे. याच दरम्यान नॅशनल कॉन्फ्रेंस नेते फारूक अब्दुल्ला यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत बोलण्यासाठी शब्दच नाहीत. आज मी आझाद आहे. आता मी दिल्ली जाणार, संसदेत उपस्थित राहून सर्वांशी बातचीत करु शकणार आहे. तसेच फारूक अब्दुल्ला यांनी राज्यातील नागरिक आणि अन्य नेत्यांसह देशातील उर्वरित भागातील लोकांचे आभार मानतो. ज्यांनी आमच्या मुक्ततेसाठीचा प्रस्ताव ठेवला होता. मला अशी आशा आहे की अन्य जणांचा सुद्धा लवकरच नजरकैदेतून मुक्त करण्यात येईल.
असे सांगितले जात आहे की, सोमवारी फारूक अब्दुल्ला हे संसदेत उपस्थित राहणार आहेत. तर पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, माकपा प्रमुख सीता राम येचुरीसह सर्व विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना एक संयुक्त पत्र लिहिले होते त्यानुसार जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्रीसह अन्य दोन जणांना नजरकैदेतून मुक्त करावे असे म्हटले होते.(जम्मू-कश्मीर सरकारकडून डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावरील नजरकैद संपवण्याचे आदेश)
केंद्रातील सरकारने जम्मू-कश्मीर मधून कलम 370 रद्द केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच तेथे कलम 144 लागू करण्यात आला होता. त्यावेळीच उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तर एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीर मधील सरकारने फारूक अब्दुल्ला यांच्यावरील नजरकैद संपवण्याचे आदेश दिले होते.