Indian Independence Day 2024: 'एक देश एक निवडणूक' धोरणाचा विचार व्हावा, 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची पंतप्रधान मोदी यांची योजना

यामुळे धर्माच्या आधारे होणारा भेदभाव कमी होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

PM Modi at Red Fort | X

विकसित भारत 2047 (Vikasit Bharat)  च्या थीम वर यंदा भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरील (red Fort) भाषणामध्ये ' एक देश एक निवडणूक' (One Nation One Election) चा उल्लेख केला आहे. सतत देशात सुरू असलेल्या निवडणूका या प्रगतीमध्ये अडथळा आहेत त्यामुळे विकासात अडचणी येत असल्याचं सांगत आता देशात 'एक देश एक निवडणूक' चा विचार व्हावा असं त्यांनी म्हटलं आहे.

राजकीय पक्षांनी एक देश एक निवडणूक चा व्यापक विचार करावा. एका समितीने अहवाल मांडावा असे आवाहन केले आहे. भारतामधील स्त्रोतांचा वापर सामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात अधिक करत त्याचा अपव्यय टाळण्यासाठी 'एक देश एक निवडणूक' धोरणाची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. नक्की वाचा:  Indian Independence Day 2024: भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त PM Narendra Modi यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन. 

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लाखभर तरूणांना राजकारणामध्ये आणणार

नरेंद्र मोदींच्या आजच्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये त्यांनी राजकीय पक्षांमध्ये, राजकारणामधील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आणि लोकशाहीच्या सबलीकरणासाठी सामान्य कुटुंबांतील सुमारे लाखभर तरूण राजकारणामध्ये आणण्याचा आपला मानस आहे. असे तरूण आता राजकारणात येईल ज्यांच्या घरात राजकारणाचा कोणताही संबंध नसेल. नात्या गोत्यात कोणीही राजकारणाशी संबंधित नसलेले तरूण अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा, लोकसभा मध्ये काम करू शकतील. त्यांना कोणत्या पक्षात जाण्याची सक्ती नसेल. दरम्यान यामुळे घराणेशाही, जातीयवादापासून मुक्ती मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

सेक्युलर सिव्हिल कोड स्वीकारला पाहिजे -  पंतप्रधान मोदी

भारतामध्ये कम्युनिल सिव्हिल कोड आहे. यामध्ये आता बदल होण्याची गरज आहे. आता कम्युनल सिव्हिल कोड मधून सेक्युलर सिव्हिल कोड कडे जाण्याची गरज आहे. यामुळे धर्माच्या आधारे होणारा भेदभाव कमी होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.