हातकणंगले लोकसभा मतदारसंघ: खासादार राजू शेट्टी यांची हॅट्रिक की धैर्यशील माने यांचा विजयी गुलाल?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांना शिवसेनेने रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे हा सामना आत खासदार राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने असा रंगणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha constituency) हा राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) हे या मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधत्व करतात. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही राजू शेट्टी हातकणंगले (Hatkanangale ) येथून रिंगणात आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेना (Shiv Sena ) उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे मैदानात आहेत. शेतकरी नेता विरुद्ध सहकार सम्राट किंवा प्रस्थापीत असा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळतो. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार अस्लम सय्यद हे देखील या मतदारसंघात नशिब आजमावत आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघहा काँग्रेस आणि काँग्रेस विचारांशी संबंधीत पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेली दोन दशके शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडून काढत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी येथून एकहाती विजय संपादन केला. 2014 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवेदिता माने आणि राजू शेट्टी यांच्यात चांगलाच सामना पाहायला मिळाला. त्या निवडणुकीत (2014) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना 4 लाख 81 हजार 25 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवेदिता माने यांना 3 लाख 85 हजार 965 तर, शिवसेना उमेदवार रघुनाथ पाटील यांना 55 हजार 50 मते मिळाली.(हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

दरम्यान, या वेळी रघुनात पाटील हे रिंगणात नाहीत. या मतदारसंघातून माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांना शिवसेनेने रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे हा सामना आत खासदार राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने असा रंगणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2019 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

