हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी आज प्रचारसभेचा शेवटचा दिवस, 21 तारखेला पार पडणार मतदान

तर येत्या 21 तारखेला मतदान पार पडणार असून देशभरातील सर्वांचे लक्ष आता निवडणूकीकडे लागले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) आणि हरियाणा (Haryana) मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी आज प्रचारसभेचा शेवटचा दिवस आहे. तर येत्या 21 तारखेला मतदान पार पडणार असून देशभरातील सर्वांचे लक्ष आता निवडणूकीकडे लागले आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचारसभेच्या तोफा थंडावणार आहेत. शुक्रवारी दोन्ही राज्यात विविध राजकीय पक्षाच्या प्रचाररॅली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून योग्य पक्षाला निवडणून द्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तर या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

आज प्रचारसभेचा शेवटचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा येथे दोन सभा घेणार आहेत.पहिली सभा सिरसा आणि त्यानंतर रेवाडी येथे नागरिकांना संबोधित करणार आहेत. दुसऱ्या बाजूला अमित शहा महाराष्ट्रातील नंदुरबार, अकोला आणि अहमदनगर येथे प्रचारसभा घेणार आहेत. तसेच कर्जत जामखेड येथे रोड शो सुद्धा करणार आहेत.

दरम्यान हरिणा आणि महाराष्ट्रात शुक्रवारी प्रचारसभांचा धडाका सुरुच होता.भाजपने त्यांच्या नावार मतदारांना प्रोत्साहित करत मत देण्यास सांगितले. तर काँग्रेसने त्यांची सत्ता पुन्हा यावी याचा पूर्णपणे प्रयत्न करताना दिसून आले. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी असे म्हटले की, फडणवीस सरकार पुन्हा आले तर 85 टक्क्यांपेक्षा अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन शहा यांनी दिले आहे.(Maharashtra Assembly Election 2019: कमळ, हाताचा पंजा आणि घड्याळ, जाणून घ्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास)

हरियाणा येथे 90 विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक पार पडणार आहे. तर आज संध्याकाळी प्रचारसभांना ब्रेक लागणार आहे. तसेच काँग्रेसकडून महाराष्ट्रात सुद्धा जोरदार प्रचार करण्यात आला. पक्षाचे वरिष्ठ नेता आनंद शर्मा यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif