मोदी सरकार पुन्हा एकदा सत्ता आल्यावर संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात, जुलैमध्ये अर्थसंकल्प सादर करणार?

तत्पूर्वी आता दिल्ली (Delhi) मध्ये नव्या सरकारकडून पहिल्या अधिवेशनाबद्दलच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

एनडीएच्या (NDA) सरकाने यंदाच्या लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला असून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तत्पूर्वी आता दिल्ली (Delhi) मध्ये नव्या सरकारकडून पहिल्या अधिवेशनाबद्दलच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच संसदीय अधिवेशन असणार आहे. त्याचसोबत जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूकीत एकट्या भाजपला स्पष्ट बहुमताने 300 चा आकडा पार केला आहे. तर मोदी यांनी आज गुजरामध्ये त्यांच्या आईंची भेट घेतली. तसेच मोदींच्या स्वागतासाठी गुजरात येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. तर येत्या जुलै महिन्यात मोदी सरकार पहिले पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.(नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार, राष्ट्रपती भवनात सोहळा पार पडणार)

तसेच नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास राष्ट्रपती भवनात ) पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्रिपरिषदाच्या अन्य सदस्य सुद्धा त्यांना देण्यात येणाऱ्या पद आणि गोपनीयतेबद्दल शपथ घेणार आहेत.