Nitin Gadkari: मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो, सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अनोखा सल्ला

सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे सुचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.

Nitin Gadkari (Photo Credit - PTI)

नितीन गडकरी (Nitin Gadkari) कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलीसाठी चर्चेत असतात. केवळ भाजपकडूनचं (BJP) नाही तर विरोधकाकडून देखील गडकरींच्या कामाचं कौतुक होत. गडकरी म्हणजे स्पष्ट वक्ते. भाजपचे सरकारमधील नितीन गडकरी एक महत्वाचे नेते असुन देखील बरेचदा ते परखडपणे स्वतच्या भुमिका मांडताना दिसतात. यावेळी नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) शेतकऱ्यांना अनोखा सल्ला दिला आहे. नागपुरात (Nagpur) अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या (Agro Vision Foundation) वतीन विदर्भातील (Vidarbha) फळ (Fruits) आणि भाजीपाला (Vegetables) उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. दरम्यान गडकरींनी शेतकऱ्यांना काही विशेष टीप्स दिल्यात.

 

स्वतःच्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी स्वत प्रयत्न करा. सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून तुम्हाला सांगतो असे सुचक वक्तव्य नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. तसेच आपल्याकडे लोकांचा विश्वास सरकार (Government) आणि परमेश्वरावर खूप असतो. मात्र, लग्न झाल्यानंतर नवविवाहितांनी प्रयत्न केले नाहीत आणि परमेश्वर आणि सरकारने कितीही इच्छा व्यक्त केली तरी घरी पाळणा हलणार नाही असा विनोद (Joke) करत त्यांनी स्वतचा शेती माल उत्तम पध्दतीने विकण्यासाठी कंबर कसण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. (हे ही वाचा:-BJP VS Congress: राहुल गांधींच्या 41 हजारांच्या टीशर्ट वरुन भाजप विरुध्द कॉंग्रेस ट्वीटर वॉर)

 

माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी भाजीपाला (Vegetables) व फळ (Fruits) उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच कृषी (Agriculture) क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या" असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केलं आहे.