CWC Meeting: 'राहुल गांधी यांनी पत्र लिहणार्‍या 23 नेत्यांचे भाजपासोबत संगनमत' वक्तव्य केलं नसल्याचे स्वतः कळवल्याने ट्वीट मागे - कपिल सिब्बल यांचं स्पष्टीकरण

दरम्यान कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्ष नेतृत्त्वामध्ये बदल करण्याची मागणी केली होती.यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, अशोक चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

File image of Congress leader Kapil Sibal | (Photo Credits: PTI)

कपिल सिब्बल (Kapil Sibal)  यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांना लक्ष्य करत ट्वीट केल्याने चर्चा रंगली होती. मात्र कॉंग्रेस कार्यकारणी बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टीका करत त्यांच्या भाजपासोबत संगनमताबद्दल टीका टिपण्णी झाली नसल्याची माहिती रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी दिल्यानंतर कपिल सिब्बल यांनी देखील आपण ट्वीट मागे घेत असल्याची भूमिका घेत पूर्वी केलेले ट्वीट डिलिट केले आहे. मात्र नव्याने ट्वीट करताना, 'राहुल गांधी यांनी स्वतःहून मला अशी टिप्पणी केली नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मी ट्वीट मागे घेत असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस च्या हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सोनिया गांधी.

दरम्यान कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्ष नेतृत्त्वामध्ये बदल करण्याची मागणी केली होती.यात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, अशोक चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

कपिल सिब्बल यांचं नवं ट्वीट

रणदीप सुरजेवाला

 

कॉंग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी कपिल सिब्बल यांना ट्वीट करत आपण मोदी सरकार विरूद्ध उभं राहणं गरजेचे आहे. आपण एकमेकांना आणि पर्यायाने कॉंग्रेस पक्षाला नुकसान पोहचणं हितावह नाही. कृपया मीडीयाच्या खोट्या वृत्ताच्या फेर्‍यात अडकू नका असे म्हटलं आहे.

सध्या सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आहे. आता पुन्हा त्यांच्याकडेच नेतृत्त्व जाणार की राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होणार असा प्रश्न आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.