IPL Auction 2025 Live

Coronavirus: टाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा कोरोना व्हायरसवरील उपाय नाही, राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता कोरोना व्हायरसच्या अंध:काराला दूर पळवण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, लोकांना टाळ्या वाजवणे किंवा दिवे लावण्यास सांगितल्याने कोरोना व्हायरसवर उपचार होणार नाही आहेत. तसेच भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून अद्याप काही जणांवर उपचार करण्यात आलेले नाहीत. त्याचसोबत नागरिकांना टाळ्या वाजवणे किंवा दिवे लावण्याचे सांगून ही समस्या काही दूर होणार नाही आहे. कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत असलेल्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवणे आवाहन नागरिकांना केले होते.

यापूर्वी काँग्रेस नेते शशि थरुर यांनी सुद्धा ट्वीट करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी असे म्हटले होते की, प्रधान शोमॅन यांचे बोलणे ऐकले. लोकांचे दुख, त्यांच्यावरील संकट आणि आर्थिक चिंता कमी करण्याबाबत काही उल्लेख केला नाही. ऐवढेच नाही तर लॉकडाउनच्या काळात भविष्यातबाबतच्या दृष्टीकोनासंदर्भातील मुद्द्यांवर सुद्धा भाष्य केले नाही. त्याचसोबत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सुद्धा कोरोना व्हायरसचा थांबवायचे कसे, टेस्टिंग किट किंवा गरिबांना खाणे देणे आणि कामगारांना आर्थिक मदत जरुर करा असे म्हटले.(Amul Topical: अमूलने डूडल साकारत केले मोदींच्या दिवे लावण्याच्या संकल्पनेचे समर्थन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अशी प्रतिक्रीया)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरच्या विरोधात लढण्यासाठी लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पु्न्हा संवाद साधत रविवारी घरातील लाईट्स बंद करुन दिवे लावून कोरोनाला पळवून लावू असे आवाहन केले आहे.