डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश: महत्त्वाची कारणे
सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक धनंजय महाडीक ज्या पक्षातून खासदार आहेत. त्याच पक्षात डॉ. पाटील यांनी प्रवेश करावा याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. डॉ. पाटील यांच्या राष्ट्रवादीची काही प्रमुख कारणे सांगितली जातत. ती अशी..
Dr. D. Patil joins NCP: त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल, काँग्रेस नेते आणि शिक्षणसम्राट अशी ओळख असलेले नेते डॉ. डी. वाय. पाटील (Dr. D. Patil) यांनी काँग्रेस पक्षाला (Congress Party) सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने पश्चिम महाराष्ट्र आणि खास करुन कोल्हापूर (Kolhapur)जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांचा परिवार गेली अनेक वर्षे काँग्रेससोबत आहे. त्यांचे चिरंजीव सतेज उर्फ बंटी पाटील हे काँग्रेसकडून राज्याचे गृह राज्यमंत्रीही होते. असे असताना सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक धनंजय महाडीक ज्या पक्षातून खासदार आहेत. त्याच पक्षात डॉ. पाटील यांनी प्रवेश करावा याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. डॉ. पाटील यांच्या राष्ट्रवादीची काही प्रमुख कारणे सांगितली जातत. ती अशी..
कोल्हापूरच्या राजकारणावर पुन्हा एकदा मजबूत पकड
कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडीक यांना पक्षांतर्गत आणि सातत्याने वाढत असलेला विरोध. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून येऊनही निवडून आलेपासून सातत्त्याने सत्ताधारी भाजप वर्तुळाशी बसऊठ. त्यामुळे ते अल्पावधीतच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी न थांबणारी चर्चा. त्यामुळे ऐनवेळी महाडीकांकडून दगाफटका झालाच तर पक्षाकडे सक्षम उमेदवाराचा पर्याय हवा. त्यासाठी डॉ. डी. वाय पाटील हे बिनतोड उमेदवार ठरु शकतात. वेळप्रसंगी पाटील यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पसंती मिळण्याची शक्यता.
आर्थिक, सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या एक बलाढ्य नेता पक्षात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील मरघळ झटकण्यास मदत. धनंजय महाडीक राष्ट्रवादीच्या तिकीटावर दुसऱ्यांदा निवडूण रिंगणात उतरल्यास त्यांचा पारंपरिक विरोधक सतेज पाटील यांचा विरोध होऊन नये. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची राजकीय दूरदृष्टी. डॉ. पाटील राष्ट्रवादीच आल्यामुळे महाडीक यांच्या बहुसंख्य अडचणी कमी झाल्या.
शरद पवार यांचा दूरदृष्टीपणा आणि धक्कातंत्र
डॉ. डी. वाय पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या रुपाने शरद पवार यांनी काँग्रेसवर पश्चिम महाराष्ट्रात एकप्रकारे दबावच टाकला आहे. दुसऱ्या बाजूला, त्यांनी विद्यमान खासदार महाडीक यांनाही सूचक संदेश दिला आहे.
डॉ. डी. वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण, सत्तेतून बाहेर असलो तरी, आपले धक्कातंत्र आजही कायम असल्याचे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे हे नक्की.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)