CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर, 31 जुलैला देणार औरंगाबाद जिल्ह्यला भेट
31 जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यास भेट देणार आहेत, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) नुकतीच शिवसंवाद यात्रा केली. या यात्रेत केंद्र स्थानी होता तो मराठवाडा. आदित्य ठाकरेंनी औरंगाबादसह पैठणमध्ये (Paithan) रॅली काढत शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेची राज्यभर चर्चा झाली. आता आदित्य ठाकरें पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील मराठवाडा दौरा करणार आहे. 31 जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यास भेट देणार आहेत. अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे. तरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिला दौरा असणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेनी गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचा दौरा केला पण तो महापूराच्या पार्श्वभुमिवर. आता आढावा दौरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा पहिलाचं दौरा असणार आहे.
मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर औरंगाबादचं(Aurangabad) नामांतर संभाजीनगर (Sambahji Nagar) करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) घेतला. त्यांचा या निर्णयावर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. पण नामांतरानंतर पहिल्यादाचं आता मुंख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौऱ्याला विशेष महत्व आहे. दरम्यान फक्त औरंगाबाद शहरचं नाही तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्री करणार असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मराठवाडा शिवसेनेचा गड आहे तसेच महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) दोन मंत्री आपलं मंत्रीपद सोडून शिंदे गटात सामिल झाले आहे. म्हणून शिवसेना (Shiv Sena) आणि मराठवाडा (Marathwada) यांत विशेष समीकरण आहे. (हे ही वाचा:-Sandipan Bhumare: आदित्य ठाकरेंच्या पैठण दौऱ्यानंतर बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल)
तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सुध्दा लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. शिंदे सेना विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. तरी दोन्ही कडून रोजी आरोप प्रत्यारोपाची मालिका दोन्ही बाजूने बघायला मिळते. तरी ही लढाई आता फक्त सत्तासंघर्षाची लढाई नसून प्रतिष्ठेची लढाई झाली आहे.