शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय नारायण राणे यांच्या पक्षाचं विलिनीकरण करणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 च्या तारख्या पुढील काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय भूकंपांना सुरूवात झाली आहे. येत्या 1 सप्टेंबरला भाजपामध्ये नारायण राणे यांच्यासह 3 मोठ्या राजकीय नेत्यांचा प्रवेश होणार आहे. त्यासोबतच नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील भाजपामध्ये विलीन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र राणेंच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष शिवसेना दुखावली आहे. त्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षासोबत चर्चा केल्याशिवाय राणेंच्या पक्षाच्या विलीनीकरणावर निर्णय घेतला जाणार नाही. असे सांगितले आहे.  नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलनीकरणाला शिवसेनाचा विरोध

मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेश आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवसेनेची मनधरणी केली जाईल असा विश्वास देखील बोलून दाखवला आहे.

काही दिवसांपासून राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुढील काही दिवसांतच मोठी घोषणा आणि राजकीय निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली जाईल असे सांगितले होते. भाजपासोबत राहणार की नाही या राणेंच्या निर्णयाकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पूर्वी शिवसेना, त्यानंतर कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर आता राणेंची पुढील भूमिका काय असेल? याकडे राणे समर्थकांसह सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई मध्ये बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपादरम्यान तोडगा काढण्यासाठी राणे काल ( 29 ऑगस्ट) वडाळा डेपोमध्ये पोहचले. तेथेच त्यांनी भाजपा प्रवेशाबद्दल पत्रकारांना माहिती दिली. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.