Midday Meal मध्ये अंड्याचा समावेश, भाजप नेत्यांकडून संपात व्यक्त
छत्तीसगढ (Chhattisgarh) येथे मध्यान्ह (Mid Day Meal) जेवणात अंड्याचा समावेश केला जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी (16 जानेवारी) घेतला.
छत्तीसगढ (Chhattisgarh) येथे मध्यान्ह (Midday Meal) जेवणात अंड्याचा समावेश केला जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी (16 जानेवारी) घेतला. परंतु यामुळे भाजप (BJP) नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात असून सरकारवर टीका करण्यात येत आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला आपली सत्ता स्थापन करता आली. त्यामुळे अवघ्या काही दिवसात आपली धोरण राबत मध्यान्ह जेवणात अंड्यांचा समावेश केला जात असल्याचा निर्णय देण्यात आला. मात्र भाजपचे नेते सच्चिदानंद उपासने यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्याचसोबर राज्यात ब्राम्हण वर्गाच्या लोकांसह विविध समाजीतील लोक शुद्ध शाकाहारी जेवण जेवतात. अशा लोकांसाठी मांसाहार वर्ज मानले जाते. त्यामुळे सरकारला मांसाहार जेवण द्यायचे असेल तर ते मांसाहार करणाऱ्यांच्या घरी जाऊन द्यावे अशी टीका करण्यात आली आहे. तर सार्वजिक ठिकाणी अंडी वाटून परंपरा मोडीत काढू नये अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे.
मात्र राज्य सरकार दिलेल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त अंडे देण्यात येईल. तर शाकाहारी विद्यार्थ्यांना दूध आणि शाकाहारी पदार्थ देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे,