B S Yediyurappa आज संध्याकाळी घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Yediyurappa) यांच्या गळ्यात पडणार आहे. नुकतीच येडियुरप्पा यांनी गर्व्हनरांची भेट घेऊन आज (26 जुलै) संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती दिली आहे.

BS Yeddyurappa (Photo Credits: Twitter)

कर्नाटकामध्ये विधानसभेत कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यानंतर आता भाजपाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाची माळ येडियुरप्पा ( B.S. Yediyurappa) यांच्या गळ्यात पडणार आहे. नुकतीच येडियुरप्पा यांनी गर्व्हनरांची भेट घेऊन आज (26 जुलै) संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती दिली आहे. कर्नाटकात जेडीएस-कॉग्रेसचे सरकार पडल्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. कर्नाटकाचे विधानसभा अध्यक्ष आर.रमेश कुमार यांनी तीन बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

कर्नाटक विधानसभेत 23 जुलै दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं 99 आमदारांनी मतदान केलं. तर 105 मतं सरकारच्या विरोधात गेली. त्यामुळे आता कुमारस्वामींना सत्ता सोडावी लागेल. Karnataka Assembly Floor Test: हा कर्नाटक लोकशाही, प्रामाणिकपणा आणि जनतेचा पराभव; काँग्रेस-जेडीएस चं सरकार कोसळल्यानंतर राहुल गांधी यांचं ट्विट

ANI Tweet:  

सुरुवातीला 11 आमदारांनी बंडखोरी केली त्यानंतर आणखी सहा जणांनी बंडखोरी केली. ज्यामुळे काँग्रेसच्या मदतीने उभे असलेले कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले. पुढे विश्वासदर्शक प्रस्ताव हरल्यानंतर आता भाजपा सत्ता स्थापनेसाठी घाई करणार आहेत. आज दुपारी भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.