साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार-नीतीश कुमार

भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करत असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सांगितले आहे

Nitish Kumar (Photo Credits: ANI Twitter)

भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार करत असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सांगितले आहे. इतकंच नव्हे तर, गांधीजींवर साध्वी ने केलेले कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी साध्वी यांनी नथूराम गोडसे हा देशभक्त असल्याचे वक्तव्य केले होते.

दहशतवादी घटनेची आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सध्या आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे खूपच चर्चेत आहेत. नथूराम गोडसे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे बरेच पडसाद पाहायला मिळाले. त्यामुळे एकूणच परिस्थिती लक्षात घेता भाजपासोबत गठबंधन केलेले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी साध्वीला पक्षातून बाहेर करण्याचा आम्ही विचार करत आहोत असे सांगितले आहे. पटनामध्ये मतदान केल्यानंतर बूथ मधून बाहेर पडत असताना त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी असे सांगितले.

'नथूराम गोडसे देशभक्त', भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वादग्रस्त विधान

तसेच ऐन उन्हाळ्यात आलेल्या या निवडणुकांमुळे लोकांना प्रचार रॅलीत येणे किंवा मतदान करण्यास येणे शक्य होत नाही. म्हणून लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात काही बदल करण्याची आवश्यकता आहे असेही ते पुढे म्हणाले. तसेच निवडणुका ह्या इतक्या लांबणीवर न नेता, त्याविषयी सर्वदलीय बैठक झाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.