दिल्लीत जिन्स आणि जनतेत आल्यावर साडी घालतात प्रियांका गांधी- भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
त्यामुळे विरोध पक्षाकडून वारंवार आजपर्यंत त्यांच्यावर विविध टीका-टिप्पणी केली जात आहे. तर आता उत्तर प्रदेशचे खासदार हरीश द्विवेदी यांनी प्रियांका गांधी यांच्या पेहरावावरुन वादग्रस्त वक्तव्य मीडियासमोर केले आहे.
प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी औपचारिकरित्या काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे विरोध पक्षाकडून वारंवार आजपर्यंत त्यांच्यावर विविध टीका-टिप्पणी केली जात आहे. तर आता उत्तर प्रदेशचे खासदार हरीश द्विवेदी (Harish Dwivedi) यांनी प्रियांका गांधी यांच्या पेहरावावरुन वादग्रस्त वक्तव्य मीडियासमोर केले आहे.
प्रियांका गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सक्रीय पद्धतीने राजकरणात प्रवेष करण्याबाबात विचारले असता, द्विवेदी यांनी माझ्यासाठी किंवा भाजप पक्षासाठी प्रियांका गांधी यांचा मुद्दा येत नाही. तर राहुल गांधी अयशस्वी आहेत त्यामुळे प्रियांका गांधी सुद्धी अयशस्वी होणार. त्याचसोबत मीडियाशी द्विवेदी यांनी बोलताना असे म्हटले की, प्रियांका गांधी जेव्हा दिल्लीत असतात त्यावेळी त्या जिन्स-टॉप घालतात आणि जनतेत असतात तेव्हा साडी आणि कुंकु लावून येतात.(हेही वाचा-शरद पवार शकुनीमामा, प्रियांका गांधी म्हणजे तैमूर- पुनम महाजन)
यापूर्वी ही भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी प्रियांका आणि राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली होती. तर मोदी हे रामाची भुमिका पार पाडत असल्याचे ही म्हटले होते. मात्र राहुल गांधी प्रियांका यांनी शुर्पणखा हिच्या भुमिकेत पाठवत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते.