Maharashtra Political Crisis:: अजित पवार गटावर बच्चू कडू नाराज, माध्यमांसमोर मांडली 'ही' भुमिका.........

महाराष्ट्रात राजकिय भुकंप झाला दरम्यान राज्यात ह्या चर्चेला उधाण आले आहे. बच्चू कडू यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Ajit pawar And Bachchu kadu (photo credit- FB)

Maharashtra Political Crisis: राज्यात राजकिय भुंकप झाल्यामुळे राज्यात सर्वींकडे चर्चा चालू झाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक झालेल्या ह्या शपथविधी मुळे राज्यात चांगलीच राजकिय चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) 9 मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार राष्ट्रवादीचा गट शिंदे आणि भाजप यांच्या राज्य सरकार  गटात सामील झाला आणि सत्तेत सामील झाला. परिणामी राष्ट्रवादी गटाला शिंदे गटात सामील केल्यामुळे शिंदे गटातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बऱ्याच महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचे काम रखडले असताना, दरम्यान अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शपथविधी सोहळा 2 जुलै रोजी पार पाडला.  राज्य सरकारच्या शिंदे गटात नागाजी असल्याच्या चर्चा सगळीकडे चालू आहेत. शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडूंनी माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

 शिंदे आणि फडणवीसांच्या वेगवान विकासाची भुरळ अजित पवारांना पडली. अशी नाराजी बच्चू कडूंनी माध्यमांसमोर मांडली. जे शेवटी आले, त्यांना आधी जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना आता शेवट जेवण मिळणार काय माहीत?  नाराज कुणी असेल तर माहीत नाही, पण आता नाराजी करून काही होणार नाही. फक्त त्यांना नाराज करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे”, असं बच्चू कडूंनी यावेळी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now