महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी अप्सरा रेड्डी यांची वर्णी
काँग्रेस (Congress) महिला आघाडीच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी (Apsara Reddy) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस (Congress) महिला आघाडीच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी (Apsara Reddy) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्वीटरवरुन सांगितले आहे.
ट्रान्सजेंडर व्यक्तीला राजकीय पक्षात महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याची ही पहिली वेळ आहे. तसेच महिला काँग्रेस अध्यक्षा सुषमा देव यांच्या उपस्थितीत अप्सरा रेड्डी यांच्याकडे महासचिव पद देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रसे पक्षाचा 132 वर्षांच्या एतिहासात प्रथमच अशी गोष्ट घडल्याने सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. अप्सरा रेड्डी यांनी असे म्हटले की, 'ट्रान्सजेंडर व्यक्तींना कोणताही अधिकार दिला जात नाही असे वारंवार लोकांकडून ऐकले आहे'. (हेही वाचा- राफेल डील: मोदी सरकारला अडचणीत आणणारे राहुल गांधी यांचे ५ प्रश्न)
तसेच देशातील राजकीय पक्ष आणि सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणं म्हणजे भावनिक क्षण असल्याचे अप्सरा रेड्डी यांनी म्हटले आहे. अप्सरा रेड्डी यांनी ब्रॉडकास्ट जर्नलिझमची पदवी मिळवली आहे. तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये ही नोकरी केली आहे. यापूर्वी अप्सरा रेड्डी यांनी मे 2016 रोजी 'एमआयएडीएमके' पक्षात प्रवेश केला होता.