Amit Shah On Owaisi Attack: ओवेसींवरील हल्ल्याबाबत अमित शहांचं वक्तव्य, ओवैसींनी तात्काळ सुरक्षा स्वीकारावी

त्यावर आताही चर्चा होत आहे. शाह म्हणाले की, याप्रकरणी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन अनधिकृत पिस्तुल आणि एक अल्टो कार जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीम कार आणि घटनास्थळाची कसून चौकशी करत असून पुरावे गोळा करत आहेत.

Amit Shah (Photo Credit - Twitter)

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी सोमवारी राज्यसभेत (Rajya Sabha) मंत्रालयाच्या वतीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ओवेसी यांचा हापूरमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा ते त्या मार्गावरून निघाल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नव्हती. शेवटी अमित शाह म्हणाले की, मी ओवेसींना सरकारने दिलेली सुरक्षा घेण्याची विनंती करतो. ओवेसी यांच्यावरील हल्ल्यावर बोलताना शाह म्हणाले की, 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता खासदार जनसंपर्क करून परतत होते. त्यानंतर 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. ही घटना तीन साक्षीदारांनी पाहिली. या घटनेबाबत पिलखुवा येथे एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. त्यावर आताही चर्चा होत आहे. शाह म्हणाले की, याप्रकरणी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन अनधिकृत पिस्तुल आणि एक अल्टो कार जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीम कार आणि घटनास्थळाची कसून चौकशी करत असून पुरावे गोळा करत आहेत.

हापूरमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता - शाह

आपल्या भाषणात शाह पुढे म्हणाले की, ओवेसी यांचा हापूरमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे या मार्गाने जाण्याची कोणतीही माहिती नव्हती. ओवेसी सुखरूप दिल्लीत पोहोचले. सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. ओवेसी यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले होते. त्यांना Z श्रेणी संरक्षण दिले आहे. ज्यामध्ये बुलेट प्रूफ कार आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. मात्र त्यांनी संरक्षण घेण्यास तोंडी नकार दिला आहे. (हे ही वाचा Murder: गुरुग्राममध्ये दारुच्या नशेत एका व्यक्तीकडून पत्नी, मुलीची हत्या, आरोपी फरार)

काय होतं प्रकरण?

असदुद्दीन ओवेसी मेरठहून प्रचार सभेनंतर परतत असताना हापूर टोल प्लाझा येथे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या, ज्याच्या कारवरील खुणा ओवेसींनी स्वतः ट्विट करून दाखवल्या आहेत. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. त्यानंतर पिलखुवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास दिला नकार

कारवर गोळीबाराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने असदुद्दीन ओवेसी यांना Z दर्जाची सुरक्षा देण्याचे बोलले होते, मात्र ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. मात्र, AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचे बोलले होते. स्वखर्चाने बुलेट प्रुफ वाहनाची मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. तसेच ओवेसी यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे आणि त्या परवान्याच्या आधारे ग्लॉक शस्त्रे ठेवण्याची परवानगी घेणार आहे.

.