अहमदनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू स्थिती

हाती आलेल्या निकालानुसार एकूण 17 प्रभागांतील 68 जागांपैकी भाजप 18, शिवसेना, 17, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी 25, मनसे 01, बसपा 04, अपक्ष 03, तर इतर 08 जागांवर विजयी झाले. निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्षांत लढत झाली.

अहमदनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू स्थिती
Ahmednagar Municipal Corporation | (Photo courtesy: archived, edited, images)

Ahmednagar Municipal Corporation Election 2018 Poll Results: अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला दिले नाही. त्यामुळे इथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. हाती आलेल्या निकालानुसार एकूण 17 प्रभागांतील 68 जागांपैकी भाजप (BJP) 14, शिवसेना (Shiv Sena) 22, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (CONGRESS) आघाडी 25, मनसे 01, बसपा 04, अपक्ष 03, तर इतर 07 जागांवर विजयी झाले. निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्षांत लढत झाली.

महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात होते. एकूण प्रभागातील, अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १८ जागा राखीव आहेत. राजकीय विश्लेषणासाठी विद्यमान स्थितीवर नजर टाकायची तर, राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडी करून मैदानात आहेत. तर, राज्यात आणि केंद्रात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना, भाजप स्वतंत्र लढत आहेत. महापालिका निवडणूकीसाठी एकूण असलेल्या 68 जागांसाठी भाजप सर्वच्या सर्व 68 जागा लढवत आहे. तर, शिवसेना 61, राष्ट्रवादी 46, काँग्रेस 21 जागा लढवत आहे. भाजपच्या एकूण 68 उमेदवारांपैकी 35 महिला उमेदवार आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान होते. (हेही वाचा, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकाल 2018: सविस्तर जाणून घ्या जनमताचा कौल)

अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक इतिहासावर नजर टाकता महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेचा महापौर निवडूण आला होता. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच राजकीय पक्षाला अहमदनगरवर सलग 5 वर्षे सत्ता राखता आली नाही. त्यामुळे आजच्या मतमोजणी निकालातून काय समोर येते याबाबत उत्सुकता होती.

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2018 01:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).