खल्लास..! ईशा कोप्पीकर देणार कमळाला साथ, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

तिला बॉलिवूडमधील 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखले जाते. ईशा कोप्पीकर हिने 1998 मध्ये 'काढ़ल कविताई' तमिळ चित्रपटातून अभिनयात पाऊल ठेवले. सन 2000 मध्ये ईशाने 'फिजा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले

Actor Isha Koppikar joins BJP | (Photo courtesy: archived, edited images)

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) आता चित्रपटाच्याच नव्हे तर, राजकारणाच्या पडद्यावरही झळकणार आहे. रविवारी तिने मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) सदस्यत्व घेत पक्षप्रवेश केला. ईशा कोप्पीकर हिचा भाजप प्रवेश होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याह भाजपचे काही मंत्री, पादाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ईशाचा भाजपामध्ये प्रवेश झाला. दरम्यान, वर्तमान स्थिती ईशावर भाजप महिला मोर्चाची घटक असलेल्या परिवहन विंगची कार्यकारी अध्यक्षा म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, चर्चीत चेहरा असलेल्या ईशाचा आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) 'स्टार कॅम्पेनर' म्हणून भाजप वापर करुन घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या पोस्टरवर आता आणखी एक सेलिब्रेटी चेहरा दिसल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

मॉडेलिंगच्या क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ईशाने अल्पवधीतच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिला बॉलिवूडमधील 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखले जाते. ईशा कोप्पीकर हिने 1998 मध्ये 'काढ़ल कविताई' तमिळ चित्रपटातून अभिनयात पाऊल ठेवले. सन 2000 मध्ये ईशाने 'फिजा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. त्यानंतर तिने 'कंपनी', 'पिंजर', 'डरना मना है', 'गर्लफ्रेंड' यांसह सुमारे 45 चित्रपटांतून काम केले. तिच्या आतापर्यंतच्या चित्रपट करिअरमधील 'राख' हा 2011 मध्ये आलेला शेवटचा चित्रपट होता. (हेही वाचा, प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा भाजपमध्ये प्रवेश; एकेकाळी होत्या काँग्रेसच्या उमेदवार)

केंद्रातील एनडीए प्रणित भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना भाजपसोबत जोडण्यासाठी पक्षाने 'संपर्क फॉर समर्थन' अभियान सुरु केले होते. या अभियानातून भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक सेलिब्रेटी चेहऱ्यांची भेट घेतली होती. तसेच, त्यांना भाजपमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले होते. मात्र, या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, नाही म्हणायला काही सेलिब्रेटी चेहरे जरुर भाजपच्या गळाला लागले. ईशा कोप्पीकरचा चेहराही त्यापैकीच एक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळास सुरु झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif