Telangana Shocker! पत्नीच्या आत्महत्येनंतर तेलंगणातील पोलिस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकाने गुरुवारी पत्नीने गळफास घेतल्याच्या काही तासांनंतर त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली.
Telangana Shocker: तेलंगणातील जानगाव शहरात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकाने गुरुवारी पत्नीने गळफास घेतल्याच्या काही तासांनंतर त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. प्राप्त माहितीनुसार, पत्नी स्वरूपा (50) हिच्या आत्महत्येबद्दल काही पोलीस अधिकारी त्यांचे सांत्वन करण्यासाठी घरी आले असताना श्रीनिवास (55) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूपाने गुरुवारी पहाटे स्कार्फने बाथरूममध्ये गळफास लावून घेतला. श्रीनिवास उठून बाथरूममध्ये गेला असता त्याने तिला लटकलेले पाहिले. या घटनेची माहिती मिळताच दाम्पत्याचे नातेवाईक आणि मित्र घरी पोहोचले. (हेही वाचा - DMK MLAs Driving Bus: डीएमके आमदाराने बस चालवली, खांबाला धडकवली खड्ड्यात घातली (Watch Video)
सहायक पोलिस आयुक्त देवेंद्र रेड्डी, शहर प्रभारी सर्कल इन्स्पेक्टर नागाबाबू आणि इतर अधिकारीही एसआयच्या घरी पोहोचले होते. दरम्यान, त्यांच्यासोबत बेडरूममध्ये बसलेला श्रीनिवास हे वॉशरूममध्ये गेले. काही मिनिटांनंतर अधिकाऱ्यांना गोळीबाराचा आवाज आला. त्यांनी वॉशरूमकडे धाव घेतली. त्यांना श्रीनिवास मृतावस्थेत पडलेले दिसलेय
या दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.