Delhi Shocker: पोलिस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, चौकशी सुरु, दिल्लीतील घटना

दिल्ली येथे एका पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारच्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Gun Shot | Photo Credit - Pixabay

Delhi Shocker: दिल्ली (Delhi) येथे एका पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारच्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक उपनिरिक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली आहे. डिफेन्स कॉलनी क्षेत्राजवळील बीपी मार्ग भागात त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा- इंदौर येथे इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला कुजलेला मृतदेह,)

मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय रामावतार आणइ एसआय प्रेम सिंग नवी दिल्लीतील बीपी मार्गावर रात्री ड्युटीवर कार्यरत होते. पहाटे 3 वाजता एएसआय रामावतार यांनी त्याच्या सहकारी उपनिरिक्षकांना 10 मिनिटे विश्रांती घेण्यास सांगितले त्यानंतर ते बॅरिकेडजवळ उभ्या असलेल्या त्यांच्या कारमध्ये बसायला गेले. काही वेळाने जेव्हा एसआय प्रेम त्यांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना रामावतार हे मृतावस्थेत सापडले. सर्व्हिस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले.

या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी रामावतार यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. सर्व्हिस पिस्तुल देखील पोलिसांनी जप्त केली. रामावतार मूळचे हरियाणा येथील महेंद्रगड येथील होते आणि 1993 मध्ये दिल्ली पोलिसात रुजू झाले. अधिकाऱ्यांने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न चिन्ह पोलिसांना उभा राहिला आहे. या घटनेमुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.