पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळं ट्वीट; कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीनिमित्त देवीकडे खास प्रार्थना!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीटरच्या माध्यमातून गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देत सार्यांना एकजुटीने कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा आजचा दिवस आहे. दरम्यान यंदा या मराठमोळ्या नववर्षावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने प्रत्येकाने घरात राहून साधेपणाने सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान आज (25 मार्च) नागरिकांनी सोशल मीडियातून गुढी पाडवा सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीटरच्या माध्यमातून गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देत सार्यांना एकजुटीने कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात चैत्र पाडवा हा नववर्षाचा पहिला म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो. त्यामुळे घराघरात आनंदाचं वातावरण असतं. गुढ्या उभारून, शोभायात्रा काढून हा सण साजरा केला जातो. मात्र यंदा देश आजपासून लॉकडाऊन असल्याने सारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा
'महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.' असं खास ट्वीट करत नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Gudi Padwa 2020 Messages: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठमोळ्या Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत!
चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा
चैत्र नवरात्रीची सुरूवात देखील गुढीपाडव्यापासून होते. गुढी पाडव्यासोबतच या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा देताना त्यांनी मी आईकडे प्रार्थना करतो की यंदा कोरोना व्हायरस संकटाशी सामना करणार्या सार्या नर्स, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलिस आणि मीडिया कर्मचारी यांना उत्तम आरोग्य, संरक्षण आणि सिद्धी मिळो. Happy Chaitra Navratri 2020 Images: चैत्र नवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.
दरम्यान यंदा नववर्षाची सुरूवात असली तरीही जगभरात थैमान घालणार्या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सार्यांच्याच संयमाची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार सह आरोग्य प्रशासनाकडून देण्यात येणार्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.