PM Narendra Modi- Kamala Harris Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कमला हॅरिस यांना भारतात येण्यासाठी आमंत्रण, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

यावेळी मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

PM Narendra Modi and US Vice President Kamala Harris (Photo Credits: ANI)

PM Narendra Modi- Kamala Harris Meet:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यामध्ये शुक्रवारी पहिल्यांदाच व्यक्तिगत रुपात भेट झाली. यावेळी मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याचसोबत त्यांनी असे म्हटले आहे की, त्या जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. तसेच  उप-राष्ट्रपती  कमला हॅरिस यांनी असे म्हटले की, भारत आणि अमेरिकेने एकत्रित काम केल्यास त्याचा जगावर सखोल परिणाम होईल. पीएम मोदी हे तीन दिवसांसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. याच दरम्यान ते QUAD बैठक, UNGA मध्ये सहभागी होणार आहेत.

ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांनी असे म्हटले की अमेरिकेच्या उप-राष्ट्रपतींच्या आधारावर तुमची निवड गरजेची आणि ऐतिहासिक होती. तुम्ही जगभरातील काही लोकांच्या प्रेरणास्थान आहात. मला विश्वास आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आपले संबंध अधिकच उंचीवर पोहचले जातील. त्याचसोबत पीएम मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचे आमंत्रण ही यावेळी देण्यात आले आहे.(Quad Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले वॉशिंग्टनला, जाणून घ्या मोदींचा दिनक्रम)

Tweet:

पुढे त्यांनी असे म्हटले की, तुमच्या यशाचा प्रवास असाच सुरु राहत भारतीयांना असे वाटते की, तुम्ही हा प्रवास भारतात सुद्धा सुरु ठेवावा. आम्ही तुमची भारतात येण्याची वाट पाहू. यासाठीच मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देत आहे. यावर हॅरिस यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिका जर एकत्रित काम करत असेल तर त्याचा जगातील लोकांवर फार मोठा प्रभाव पडेल. त्यांनी कोविड19 सह काही मुद्द्यांवरुन दोन्ही देशांच्या दरम्यानच्या मैत्रीबद्दल ही बातचीत केली.

तसेच कोविड19वर आपल्या देशांनी मिळून काम केले आहे. महारोगाच्या सुरुवातीला भारताने अन्य देशांना लस देण्याचा मुख्य स्रोत ठरला होता. त्याचसोबत अन्य मुद्द्यांवरुन करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल ही या दोघांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान, दोन्ही नेत्यांमधील भेटीची ही पहिलीच वेळ आहे. याआधी हॅरिस यांनी भारतात कोविड19 च्या संकटावेळी मोदी यांच्यासोबत फोनवरुन बातचीत केली होती. हॅरिस यांनी भारताला अमेरिकेचा महत्वाचा भाग असल्याचे म्हटले होते. तसेच नवी दिल्लीतील त्या घोषणचे स्वागत केले होते ज्यामध्ये भारत लवकरच कोविड19च्या लसींची निर्यात पुन्हा सुरु करणार असल्याचे म्हटले होते.