PM Modi's Motivational Words For CBSE Students: 'कधीच आशा सोडू नका' सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी संदेश

तसेच उर्वरित पेपर जुलै महिन्यात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच उर्वरित पेपर जुलै महिन्यात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. परंतु विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित पेपर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. दिल्लीतील सीबीएसई विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल (CBSE Class X and XII Results) इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्चट वर्क आणि असाईनमेंट्सच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यामातून त्यांनी अपयशी विद्यार्थ्यांना प्रोत्साहान देऊन एक महत्वाचा आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे. जे विद्यार्थी यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीची निकालावर नाराज आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी मी काही सांगू इच्छितो. केवळ एक परीक्षा तुम्ही कोण आहात? हे ठरवू शकत नाही. आपण प्रत्येकजण प्रतिकूल आहे. तसेच कधीही आशा सोडू नका, एक दिवस तुम्ही नक्की चमत्कार कराल, असाही विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- CBSE Class 10th Results 2020: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर; cbseresult.nic.in वर पहा तुमचे मार्क्स

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट-

सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 88.78 टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे. त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील 94.39 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदापण मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात 92.15 टक्के मुली पास झाल्या आहेत. तसेच यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेसाठी 18 लाख 85 हजार 885 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 18 लाख 73 हजार 15 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 17 लाख 13 हजार 121 विद्यार्थी पास झाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif