देशात 'या' ठिकाणी रावणाचा वध नाही तर केली जाते पुजा

देशातल्या काही ठिकाणी रावणाचा वध नाही तर पुजा केली जाते.

फोटो सौजन्य - गुगल

गुरुवारी देशभरात दसरा साजरा करण्यात आला. तर दसऱ्याच्यावेळी रावणाचा पुतळा बनवून तो जाळण्याची परंपरा भारतात अजूनही काही ठिकाणी चालू आहे. मात्र देशातल्या काही ठिकाणी रावणाचा वध नाही तर पुजा केली जाते. तर पाहूया कोणत्या ठिकाणी रावणाची पुजा केली जाते.

1.उज्जैन, मध्य प्रदेश

उज्जैनच्या चिखली गावात दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळला जात नाही. तर या ठिकाणी जर रावणाला जाळले तर संपूर्ण गाव जळून जाईल असे समजले जाते. त्यामुळेच या गावात रावणाची खूप उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

2. जोधपूर, राजस्थान

जोधपूरमधील काही स्थानिक लोक त्यांना रावाचे वंशज म्हणून मानतात. तसेच या ठिकाणी रावणाचे मंदिरही बांधण्यात आले आहे. त्यामुळेच दसऱ्याला या ठिकाणी रावण जाळत नाही.

3. कर्नाटक

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात रावणाची पूजा केली जाते. येथील धार्मिक अटींनुसार, रावण हा शंकराचा भक्त होता. त्यामुळेच येथे मंडया जिल्हायतही मालवली नावाच्या ठिकाणी रावणाचे मंदिर बांधले असून त्याला थोर शंकराचा भक्त म्हणून त्याची पूजा केली जाते.

4. अमरावती, महाराष्ट्र

अमरावतीतल्या गढचिरोलीमध्ये येथील आदिवासी लोकांकडून रावणाची पूजा केली जाते. तर येथे राहणारा आदिवासी समाज हा रावणाला आणि त्याच्या मुलाला देव म्हणून पूजा करतात.

5.बैजनाथ, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातही रावणाची पूजा अर्चना केली जाते. या ठिकाणी रावणाने शंकरासाठी तपस्या केली असता शंकराने त्याला मोक्ष प्राप्तीचे वरदान दिले होते. याच कारणामुळे येथील लोक रावणाला देव म्हणून मानतात.

6. मंदसौर, मध्य प्रदेश 

मध्यप्रदेशातील मंदसौर याचे खरे नाव दशपुर हे होते. तर रावणाची बायको मंदोदरीचे येथे माहेर होते. त्यामुळे रावणाला सन्मान देण्यासाठी या ठिकाणी त्याला जाळले जात नाही. तर येथील स्थानिक लोक रावणाची पुजा करतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Pamban Bridge Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतातील पहिल्या उभ्या समुद्री पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन, पहा व्हिडिओ

Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

Rajiv Gandhi International Stadium Pitch Stats & Records: हैदराबादमधीलहैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या खेळपट्टीचे रेकॉर्ड; सर्वाधिक धावा, विकेट्ससह खास आकडेवारी जाणून घ्या

Advertisement

BJP Foundation Day: भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, 'विकसित भारताचे स्वप्न आम्ही साकार करू'

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement