Pickpockets Brutally Beat The Passenger: धावत्या बसमध्ये पाकिटमारांचा प्रवाशाला बेदम मारहाण, संतापजनक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी म्हणजे बस स्थानक, रेल्वे स्थानक, मार्केटमध्ये ते नागरिकांच्या हालचालींवर लक्ष देऊन पैसे चोरी करतात.
Pickpockets Brutally Beat The Passenger: गर्दीचा फायदा घेत पाकिटमार पैसे चोरी करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी म्हणजे बस स्थानक, रेल्वे स्थानक, मार्केटमध्ये ते नागरिकांच्या हालचालींवर लक्ष देऊन पैसे चोरी करतात. पाकिटमारांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात पाकिटमाराच्या एका ग्रुपने दादागिरि करत एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचे सांगत आहे. दिल्लीच्या मेट्रोनंतर आता बस चर्चेचा विषय बनला आहे. (हेही वाचा- पिटबूल कुत्र्याचा अल्पवयीन मुलावर हल्ला, मालकाला अटक, नोएडा येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका बसमध्ये पाकिटमारांचा ग्रुप शिरतो. त्यानंतर बसमध्ये असेलल्या एका प्रवाशाला बेदम मारहाण करतात. दोन्ही बाजूने बेदम मारहाण झाली. ही घटना बसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बसमध्ये झालेल्या भांडणामुळे बसमध्ये बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. प्रवाशाच्या अंगावर उड्या मारत, लाथा बुक्कुीने त्याला बेदम मारहाण करतात. अक्षरश: काही क्षणानंतर प्रवाशाला बसच्या बाहेर ओढत नेले.
बसच्या बाहेर काढल्यानंतरही त्याला रस्त्यावर मारहाण केल्याचे दिसून आले. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षतेवर प्रश्न चिन्ह उभा केला आहे. व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिल्ली सरकार झोपली आहे का असं कमेंट एका युजर्सनी केली आहे. तर दुसऱ्याने लिहले आहे की, "दिल्ली सरकारने लक्ष द्यायला हवे.